)
IND VS WI : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India VS West Indies) यांच्यात 2 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा टेस्ट सामना दिल्लीत पार पडत आहे. यात भारतीय संघाने (Team India) टेस्टच्या दुसऱ्या दिवशी 5 विकेटवर 518 धावा करून पहिली इनिंग घोषित केली. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या पहिल्या इनिंगमध्ये भारतीय गोलंदाजांनी कहर केला. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना 248 धावांवर ऑल आउट केलं. यात भारताचा स्टार गोलंदाज कुलदीप यादवने 26.5 ओव्हरमध्ये 82 धावा करून 5 विकेट घेतल्या.
टेस्ट क्रिकेटमध्ये पाचव्यांदा असं झालंय की कुलदीप यादवने एका इनिंगमध्ये 5 विकेट घेतलेत. कुलदीप यादवने आतापर्यंत भारतासाठी 15 टेस्ट सामन्यांमध्ये २७ डावांमध्ये ६५ विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याने पाच वेळा एका डावात पाच विकेट्स घेतले आहेत. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात कुलदीप यादवने अॅलिक अथानासे (41), शाई होप (36), टेविन इमलाच (21), जस्टिन ग्रीव्हज (17) आणि जेडेन सील्स (13) यांना बाद केले. दिल्ली टेस्टच्या पहिल्या डावात कुलदीप यादवने भेदक गोलंदाजी केली.
BCCI (BCCI) October 12, 2025
Kuldeep Yadav gets his fifth five-wicket haul in Tests
A wonderful performance from him yet again
Updates https://t.co/GYLslRzj4Gimkuldeep18 pic.twitter.com/BUhPgnIVt6
कुलदीप यादव सध्या टीम इंडियाचा सर्वात घातक गोलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुलदीपने 332 विकेट घेतले असून तो त्याच्या भेदक गोलंदाजीने सामना पलटवण्यात माहीर आहे. या टेस्ट सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले हे लक्षात घेण्यासारखे आहे. त भारतीय संघाने टेस्टच्या दुसऱ्या दिवशी 5 विकेटवर 518 धावा करून पहिली इनिंग घोषित केली होती. तर वेस्ट इंडिजची पहिली इनिंग 248 धावांवर आटोपली. वेस्ट इंडिज आता भारताविरुद्धच्या दुसऱ्या डावात फॉलोऑन खेळत आहे. वेस्ट इंडिज संघ अजूनही भारतापेक्षा 270 धावांनी पिछाडीवर आहे.
भारताने पहिल्या इनिंगमध्ये किती धावा केल्या आणि कधी घोषित केली?
उत्तर: भारताने दुसऱ्या दिवशी ५ विकेट्स गमावत ५१८ धावा केल्या आणि पहिली इनिंग घोषित केली.
वेस्ट इंडिजच्या पहिल्या इनिंगचा स्कोअर काय होता?
उत्तर: वेस्ट इंडिजची पहिली इनिंग २४८ धावांवर संपली, ज्यात ते ऑल आउट झाले.
कुलदीप यादवने वेस्ट इंडिजच्या कोणत्या फलंदाजांना बाद केले?
उत्तर: कुलदीपने अॅलिक अथानासे (४१), शाई होप (३६), टेविन इमलाच (२१), जस्टिन ग्रीव्हज (१७) आणि जेडेन सील्स (१३) यांना बाद केले.