कोणी लग्न सोडून आलं तर कोणी हनीमून, मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी फॅन्सची क्रेज

Lionel Messi India Tour : आपल्या आवडत्या फुटबॉलरची एक झलक पाहायला मिळावी यासाठी फॅन्स भारतातील विविध शहरांमधून मेस्सी भेट देणाऱ्या शहरांमध्ये पोहोचत आहेत. काही फॅन्स तर स्वतः चं लग्न आणि हनीमून सोडून मेस्सीला पाहण्यासाठी पोहोचले आहेत. 

पूजा पवार | Updated: Dec 13, 2025, 03:29 PM IST
कोणी लग्न सोडून आलं तर कोणी हनीमून, मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी फॅन्सची क्रेज
(Photo Credit : Social Media)

Lionel Messi India Tour : फुटबॉलचा बादशाह लिओनेल मेस्सी (lionel Messi) हा तब्बल 14 वर्षांनी भारतात आलाय. मेस्सी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून तो कोलकाता, मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये कार्यक्रम घेऊन त्याच्या फॅन्सना भेटणार आहे. मेस्सीचा हा भारत दौरा त्याच्या भारतीय फॅन्ससाठी खूपच खास आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या फुटबॉलरची एक झलक पाहायला मिळावी यासाठी फॅन्स भारतातील विविध शहरांमधून मेस्सी भेट देणाऱ्या शहरांमध्ये पोहोचत आहेत. काही फॅन्स तर स्वतः चं लग्न आणि हनीमून सोडून मेस्सीला पाहण्यासाठी पोहोचले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

लग्न सोडून मेस्सीला पाहण्यासाठी पोहोचला :

कोलकात्यात 'गोट इंडिया टूर' अंतर्गत लियोनेल मेस्सी 13 डिसेंबर रोजी भारतात दाखल झाला आहे. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर मेस्सीच्या स्वागतासाठी हजारो फॅन्स एयरपोर्टवर जमले होते. 2022 च्या फिफा वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार मेस्सीचे भारतातील तीन दिवसीय दौरेची सुरुवात कोलकात्यात झाली आहे. १३ डिसेंबर रोजी सॉल्ट लेक स्टेडियममध्ये देखील मेस्सीसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  लाखो, हजारो रुपयांची तिकीट काढून त्याचे चाहते त्याला बघायला आले होते. मात्र मॅनेजमेंट गंडलं आणि मेस्सी फक्त १० मिनिटं मैदानावर राहिला आणि निघून गेला. हजारो रुपयांचे तिकिटं खरेदी करून एक झलक सुद्धा मेस्सीला पाहता न आल्याने चाहते नाराज झाले आणि त्यांनी स्टेडियममधील सामाग्रीची तोडफोड केली. यावेळी एक चाहता मेस्सीला पाहण्यासाठी त्याच लग्न सोडून तिथे आला होता. एनआयला दिलेल्या मुलाखतीत चाहत्याने सांगितले की, आज त्याचं लग्न आहे मात्र मेस्सीचा खूप मोठा चाहता असल्याने त्याला पाहण्यासाठी त्याने सॉल्ट लेक स्टेडियम गाठलं होतं. 

मेस्सीसाठी हनिमून केला कॅन्सल : 

मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी सॉल्ट लेक स्टेडियमच्या बाहेर चाहते पोस्टर पकडून उभे होते. यात एक नवविवाहित जोडा सुद्धा होता, ज्यांनी मेस्सीला पाहण्यासाठी त्यांचा हनिमूनचा प्लॅन कॅन्सल केला.  एनआयला दिलेल्या मुलाखतीत चाहत्याने सांगितले की, 'आमचे नुकतेच लग्न झाले आहे, पण मेस्सीच्या भेटीमुळे आम्ही आमचा हनिमून प्लॅन रद्द केला. आम्हाला मेस्सीला आधी पहायचे आहे. आम्ही गेल्या १०-१२ वर्षांपासून त्याच्या मागे येत आहोत आणि त्याला पाहण्यासाठी उत्सुक आहोत'.

FAQ : 

लिओनेल मेस्सी भारतात कधी आला?
उत्तर: लिओनेल मेस्सी १४ वर्षांनंतर १३ डिसेंबर रोजी भारतात दाखल झाला. त्याचा दौरा 'गोट इंडिया टूर' अंतर्गत आहे आणि तो तीन दिवसांचा आहे.

मेस्सीच्या भारत दौऱ्यात कोणत्या शहरांना भेट देणार आहे?
उत्तर: मेस्सी कोलकाता, मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये कार्यक्रम घेऊन फॅन्सना भेटणार आहे. दौऱ्याची सुरुवात कोलकात्यात झाली.

मेस्सीच्या स्वागतासाठी कोलकात्यात काय घडलं?
उत्तर: कोलकात्यात एयरपोर्टवर हजारो फॅन्स मेस्सीच्या स्वागतासाठी जमले होते. सॉल्ट लेक स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, पण मेस्सी फक्त १० मिनिटे मैदानावर राहिला.

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More