LIVE Blog ENG Vs NZ : स्पर्धेतील पहिला सामना गेल्या हंगामातील वर्ल्डकप विजेते इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम दुपारी 2 वाजता रंगणार आहे.
5 Oct 2023, 20:14 वाजता
न्यूझीलंडसाठी बॅक टू बॅक शतकं आली आहे. डिवॉन कॉन्वेनंतर आता रचिन रविंद्र याने देखील वादळी खेळी करत सेंच्यूरी पूर्ण केली.
5 Oct 2023, 20:00 वाजता
न्यूझीलंडचा सलामीवीर डिवॉन कॉनवे याने पहिल्याच सामन्यात धमाकेदार शतक ठोकलं आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडचा विजय सोपा झालाय.
5 Oct 2023, 19:06 वाजता
न्यूझीलंडच्या 100 धावा पार झाल्या आहेत. कॉर्नवे अन् रचिन रविंद्र यांनी अर्धशतक पूर्ण केलंय.
5 Oct 2023, 18:34 वाजता
283 धावांचं आव्हान पार करताना न्यूझीलंडची सुरूवात खराब झालीये. विल यंगला भोपळाही फोडता आला नाही.
5 Oct 2023, 17:14 वाजता
इंग्लंडला 8 वा धक्का बसला असून इंग्लंडने 45 ओव्हरमध्ये 250 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता 300 चं लक्ष्य बिकट झाल्याचं चित्र आहे.
5 Oct 2023, 16:58 वाजता
इंग्लंडला 7 वा धक्का बसला असून चांगल्या फॉर्ममध्ये असलेला जो रूट 77 धावा करून बाद झालाय.
5 Oct 2023, 16:45 वाजता
जोस बटलर बाद झाल्याने इंग्लंडचा अर्धा संघ तंबुत परतला आहे. मात्र दुसरीकडे जो रुट तुफान फलंदाजी करत असून त्याने 70 धावांचा टप्पा ओलांडला आहे. इंग्लंडचा संघ 38 ओव्हरनंतर 221 वर 5 गडी बाद या स्थितीत आहे.
5 Oct 2023, 16:12 वाजता
जो रुटने आपलं अर्धशतक साजरं केलं आहे. तर दुसरीकडे जॉस बटलरनेही आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली आहे. इंग्लंडची धावसंख्या 31 ओव्हरनंतर 171 वर 4 गडी बादपर्यंत पोहचली आहे.
5 Oct 2023, 15:54 वाजता
27 ओव्हरनंतर इंग्लंडचा स्कोअर 150 वर चार गडी बाद इतका आहे. जॉनी ब्रेस्ट्रो, डेविड मिलान, हॅरी ब्रूक, मोईन अली तंबूत परतले आहेत. जो रुट आणि जॉस बटलर सध्या फलंदाजी करत आहेत.
5 Oct 2023, 15:00 वाजता
इंग्लंडचा सलामीवीर जॉनी ब्रेस्टोव्ह 33 धावा करुन तंबूत परतला. मिचेल स्टॅनरच्या गोलंदाजीवर डेरल मिचेलकरवी जॉनी झेलबाद झाला. जॉनी तंबूत परतताना इंग्लंडची धावसंख्या 12.5 षटकांमध्ये 64 ला 2 गडी बाद अशी आहे.