LIVE Blog ENG Vs NZ : स्पर्धेतील पहिला सामना गेल्या हंगामातील वर्ल्डकप विजेते इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम दुपारी 2 वाजता रंगणार आहे.
5 Oct 2023, 13:34 वाजता
न्यूझीलंडने वर्ल्डकप 2023 च्या पहिल्या सामन्यात टॉस जिंकला. कर्णधार टॉम लॅथम टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचा संघ पहिल्यांदा फलंदाजी करणार आहे.
5 Oct 2023, 13:22 वाजता
वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यातील नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता होणार आहे. आज न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन खेळणार नसल्याने टॉम लॅथम न्यूझीलंडचं नेतृत्व करणार असून इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलर संघाचं नेतृत्व करणार आहे.
5 Oct 2023, 12:03 वाजता
इंग्लंडचा स्टार फलंदाज बेन स्टोक्स पहिला सामना खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. स्टोक्स दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे पहिल्या आणि महत्त्वाच्या सामन्यात तो बाहेर बसण्याची शक्यता आहे.
5 Oct 2023, 10:33 वाजता
LIVE update ENG Vs NZ : एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात 10 सामने खेळले गेले आहेतयामध्ये दोन्ही संघ ५-५ सामने जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत.
5 Oct 2023, 09:37 वाजता
कशी असणार इंग्लंड टीम
जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स.
5 Oct 2023, 09:35 वाजता
LIVE update ENG Vs NZ : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
5 Oct 2023, 07:50 वाजता
LIVE Blog ENG Vs NZ : न्यूझीलंड आणि इंग्लंड हे दोन्ही संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून न्यूझीलंडने आपले दोन्ही सराव सामने जिंकून दमदार सुरूवात केली आहे. इंग्लंडने देखील आपल्या दोनपैकी एक सराव सामना जिंकला.
5 Oct 2023, 07:11 वाजता
कुठे पाहता येणार सामने?
यंदाच्या वर्ल्डकपचे सामने प्रेक्षकांना मोबाईलवर फुकटात पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स या क्रिडावाहिनीवर प्रेक्षकांना वर्ल्डकपचे सामने पाहता येतील. याशिवाय मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार अँपद्वारे देखील सामन्यांचा थरार पाहता येणार आहे.