IND vs BAN LIVE : विश्वचषकात भारताचा सलग चौथा विजय, बांगलादेशचा उडवला धुव्वा

India vs Bangladesh Live Updates : या सामन्यात बांगलादेशचा पराभव करून सेमी फायनलमध्ये आपला मार्ग सोपा करण्याकडे भारताचं लक्ष असणार आहे.

 IND vs BAN LIVE : विश्वचषकात भारताचा सलग चौथा विजय, बांगलादेशचा उडवला धुव्वा

India vs Bangladesh Live Updates : वर्ल्डकपच्या 17 व्या सामन्यात भारताचा सामना बांगलादेशाशी होणार आहे. टीम इंडिया सलग तीन सामने जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर बांगलादेशने तीनपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे.

19 Oct 2023, 17:22 वाजता

IND vs BAN LIVE : भारताला तिसरा झटका, श्रेयस अय्यर 19 धावांवर बाद

कॅप्टन रोहित शर्माचं अर्ध शतक दोन धावाने हुकलं. त्यानंतर रोहितला साथ देणारा शुभमन गिल अर्ध शतक करुन बाद झाला. त्याने 53 धावा केल्या. त्यानंतर मैदानावर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर खेळत असताना 19 धावांवर तो बाद झाला आणि भारतला तिसरा झटका लागला. सध्या मैदानात विराट कोहली असून त्याचे अर्ध शतक झालं आहे. विराटला साथ देण्यासाठी के एल राहुल मैदानात आला आहे. तर 30 ओव्हरमध्ये भारताने 184 धावा केल्या आहेत. 

19 Oct 2023, 16:58 वाजता

IND vs BAN LIVE : टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात,रोहित- शुभमन गिल मैदानात 

बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 257 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या आव्हानाला उत्तर देण्यासाठी टीम इंडियाकडून मैदानात कॅप्टन रोहित शर्मा आणि स्टार खेळाडू शुभमन गिल खेळत आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये दोन चौके रोहित शर्माने लगावले आहेत.

19 Oct 2023, 16:05 वाजता

मेहंदी हसन बाद! बांगलादेशचा तिसराला तिसरा झटका; राहुलने घेतला भन्नाट कॅच

मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर लेग साईडचा चेंडू खेळून काढण्याच्या नादात मेहंदी हसन झेलबाद झाला. भारतीय विकेटकीपर के. एल. राहुलने आपल्या डाव्या बाजूला झेप घेत अप्रतिम झेल पकडला. 25 व्या ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या 129 वर असताना मेहंदी तंबूत परतला.

19 Oct 2023, 15:41 वाजता

भारताला दुसरं यश! रविंद्र जडेजाने शांतोला केलं पायचित

आजच्या सामन्यात कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेला नजमुल हुसैन शांतो पायचित झाला. रविंद्र जडेजाच्या फिरकी चेंडू एका धावेसाठी लेग साईडला खेळून काढण्याच्या प्रयत्नात शांतो पायचित झाला. संघाची धावसंख्या 110 वर असताना कर्णधार तंबूत परतला. 20 षटकांमध्ये बांगलादेशचा स्कोअर 110 वर 2 विकेट असा आहे.

19 Oct 2023, 15:21 वाजता

भारताला पहिलं यश! कुलदीप यादवने घेतली विकेट; अर्धशतक करुन तनझीद हसन तंबूत

15 व्या ओव्हरमध्ये भारताला पहिलं यश मिळालं आहे. कुलदीप यादवने अर्धशतकवीर तनझीद हसनला पायचीत केलं आहे. तनझीद हसन आणि लिटन दासची जोडी फोडण्यात कुलदीपला यश आलं. 

19 Oct 2023, 15:19 वाजता

भारतासाठी डोकेदुखी ठरत असलेला लिटन दास तंबूत; जडेजाने फिरकीत गुंडाळलं

82 बॉलमध्ये 66 धावा करत असलेला लिटन दास झेलबाद झाला आहे. भारतीय फिरकीपटू रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात शुभमन गिलने लिटनला झेलबाद केलं. 137 धावांवर बांगलादेशची चौथी विकेट पडली.

19 Oct 2023, 14:59 वाजता

10 ओव्हरनंतर बांगलादेशने गाठला बिनबाद 63 धावांचा टप्पा

तनझीद हसन आणि लिटन दास या बांगलादेशी सलामीवीरांची जोडी पुण्याच्या मैदानात जमली असून दोघांनी पहिल्या 10 ओव्हरमध्ये संघाला 63 धावांपर्यंत नेलं आहे. यामध्ये हसनने 40 तर दासने 22 धावा केल्या आहेत. भारतीय गोलंदाज पहिल्या 10 ओव्हरमध्ये निष्प्रभ ठरले. बांगलादेशी फलंदाजांनी पहिल्या 10 ओव्हरमध्ये 6.3 च्या सरासरीने धावा केल्या.

19 Oct 2023, 14:34 वाजता

IND vs BAN LIVE: सहा षटकांनतर बांगलादेशच्या धावा बिनबाद 21. भारताकडून जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीनं फलंदाजांवर लगाम

 

19 Oct 2023, 13:58 वाजता

'एखादा सामना हरलात तरी...'; भारत आणि बांगलादेश सामन्याआधी पाँटिंगचा रोहित-विराटला इशारा

भारताने वर्ल्ड कप स्पर्धेमधील आपले पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तानला पराभूत केलं आहे. मात्र बांगलादेशविरुद्धच्या सामन्याआधी रिकी पाँटिंगने एक इशारा दिला आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...

19 Oct 2023, 13:35 वाजता

बांगलादेशने टॉस जिंकला! प्रथम फलंदाजीचा निर्णय

पुण्यामधील सामन्याचा टॉस बांगलादेशने जिंकला. बांगलदेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जायबंदी असलेला कर्णधार शाकीब-अल-हसन सामना खेळत नसून नझमुल हुसैन सॅन्तो संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. भारतीय संघात कोणताही बदल नाही.