RR vs MI highlights, IPL 2024 : 12 वर्षाची परंपरा कायम, जयस्वालच्या तडाख्याने मुंबईविरूद्ध 9 विकेट्सने विजय

RR vs MI Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोघं संघात आज रंगतदार लढत होणार आहे. हे दोघं संघ आयपीएल 2024 मध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत, तर आजच्या सामन्यात बघण्यायोग्य असणार की, मागील सामन्याचा बदला मुंबई इंडियन्स या सामन्यात घेणार का?

RR vs MI highlights, IPL 2024 : 12 वर्षाची परंपरा कायम, जयस्वालच्या तडाख्याने मुंबईविरूद्ध 9 विकेट्सने विजय

Rajasthan Royals vs Mumbai Indians Live Score in Marathi: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोघं संघांची लढत प्रत्येक वेळी फार रंगतदार होते, तर या वर्षी जेव्हा हे दोघं संघ आमनेसामने भिडले होते, तेव्हा राजस्थान रॉयल्सने सहा विकेट्सने मुंबई इंडियन्सला त्यांच्या होमग्राउंडवर पराभूत केले होते. तर आजच्या सामन्यात बघण्यायोग्य गोष्ट असणार की, मुंबई इंडियन्स, राजस्थानला त्यांच्याच घरात हरवुन आपल्या मागील पराभवाची परतफेड पूर्ण करणार का? पॉइंट्स टेबलमध्ये जर नजर टाकली तर राजस्थान 12 पॉइंट्सोबत पहिल्या क्रमांकावर आहे, तर मुंबई ही 6 पॉइंट्ससोबत सातव्या क्रमांकावर आहे.

22 Apr 2024, 19:51 वाजता

संदिप शर्माने चौथ्या ओव्हरमध्ये परत एकदा मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का दिला आहे. सूर्यकुमार यादव हा केवळ 10 धावांवर बाद झाला आहे. तिसऱ्या विकेटनंतर मुंबईची स्थिती थोडी खराब झालीये, तर मैदानात मोहम्मद नबी हा फलंदाजीसाठी आला आहे.

22 Apr 2024, 19:41 वाजता

संदिप शर्माच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये मुंबईच्या संघाला दुसरा झटका लागला आहे. इशान किशन हा संदिप शर्माच्या स्विंगला खेळण्यात असमर्थ ठरला आणि शून्यावर तंबूत परतला. दुसऱ्या विकेटनंतर तिलक वर्मा हा फलंदाजीसाठी आलाय.

22 Apr 2024, 19:35 वाजता

ट्रेंट बोल्टने पहिल्याच ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. टीमचा इन फॉर्म फलंदाज रोहित शर्मा हा फक्त 6 धावा करून आउट झाला आहे. पहिल्या विकेटनंतर सुर्याकुमार यादव हा फलंदाजीसाठी आला आहे.

22 Apr 2024, 19:06 वाजता

RR vs MI Toss Update - मुंबईचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

MI प्लेइंग 11 -

इशान किशन (W), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएट्झे, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह

 

RR प्लेइंग 11 -

यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (W/C), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

22 Apr 2024, 18:26 वाजता

RR vs MI head to head - 

आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोघं संघ एकूण 29 वेळेस आमनेसामने आले आहेत, त्यातून 15 सामने मुंबईने जिंकत राजस्थानसमोर आपले वर्चस्व निर्माण केले आहे, तर राजस्थानच्या संघाने एकूण 13 सामने जिंकत मुंबईच्या तगड्या संघाला कडे आव्हान दिले आहे. तर या दोघं संघांमधील एक सामन्यात कोणत्याही प्रकारचा रिझल्ट आलेला नाही.