IND vs AFG Live Score: आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये भारताचा सामना आज अफगाणिस्तानशी होत आहे. दोन्ही देशांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता हा सामना खेळवला जाईल. हा सामना जिंकून भारत स्पर्धेतील आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे.
11 Oct 2023, 19:49 वाजता
IND vs AFG Live Score: रोहित शर्माचं शतक पूर्ण,सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे
IND vs AFG Live Score: भारताचा फलंदाज रोहित शर्माने शतक पूर्ण केले. या शतकी खेळीने त्याने सचिन तेंडुलकरचा रिकोर्ड मोडला आहे. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतक ठोकरणारा खेळाडू ठरला आहे. रोहितने सचिनसोबत कपिल देवचाही रेकार्ड ब्रेक केला आहे.
11 Oct 2023, 19:17 वाजता
IND vs AFG Live Score: रोहित शर्माने ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारण्याचा विक्रम
IND vs AFG Live Score: भारताचा फलंदाज रोहित शर्माने बुधवारी दिल्लीत अफगाणिस्तान विरुद्धच्या ICC विश्वचषक 2023 च्या सामन्यात ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारण्याचा विक्रम मोडला.
वेस्ट इंडिजचे पॉवरहाऊस ख्रिस गेलने 553 षटकार (551 डाव) केल्या आहेत. जे रोहितने केवळ 473 डावांमध्ये मागे टाकले होते, रोहित वनडेमध्ये शाहिद आफ्रिदी आणि गेलच्या मागे तिसऱ्या स्थानावर आहे, मात्र T20 मध्ये 140 डावांमध्ये 182 षटकारांसह षटकारांच्या यादीत आघाडीवर आहे.
11 Oct 2023, 18:57 वाजता
IND vs AFG Live Score: विश्व चषकात कॅप्टन रोहित शर्माचे 1000 धावा पूर्ण
IND vs AFG Live Score: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 9व्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध एक विक्रम केला. या सामन्यात 22 धावा केल्यानंतर रोहितने एकदिवसीय विश्वचषकात 1000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. भारतीय कर्णधाराने 19 सामन्यांच्या 19 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.
11 Oct 2023, 18:46 वाजता
IND vs AFG Live Score: भारतीय संघाकडून डावाची सुरुवात चांगली झाली. संघाने 4 षटकात 23 धावा केल्या आहेत.
11 Oct 2023, 18:02 वाजता
IND vs AFG Live Score: भारतासमोर विजयासाठी 273 धावांचं आव्हान, अफगाणिस्तान 272 धावांवर 8 विकेट
IND vs AFG Live Score: दिल्लीमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात भारतातसमोर विजयासाठी 273 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं आहे. अफगाणिस्तान 272 धावांवर 8 विकेट गमवल्या आहेत.
11 Oct 2023, 17:54 वाजता
IND vs AFG Live Score: अफगाणिस्तानला आठवा झटका! रशीद खान आऊट
IND vs AFG Live Score: अफगाणिस्तानला आठवा झटका लागला आहे. जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर कुलदीप यादवने कॅच पकडून रशीद खानला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
11 Oct 2023, 17:39 वाजता
IND vs AFG Live Score: अफगाणिस्तानला सातवा झटका! मोहम्मद नबी आऊट
IND vs AFG Live Score: बुमराहने एका षटकात दोन विकेट घेतल्या. अफगाणिस्तान संघाचे कंबरडे मोडले आहे. अफगाणिस्तानने 235 धावांवर सातवी विकेट गमावली. नबी 19 धावा करून बाद झाला.
11 Oct 2023, 17:35 वाजता
IND vs AFG Live Score: अफगाणिस्तानला सहावा झटका! नजीबुल्ला झदरन आऊट
IND vs AFG Live Score: कप्तान हशमतुल्लाह शाहिदीनंतर नजीबुल्ला झदरनलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. अफगाणिस्तानने 45 व्या षटकात 229 धावांवर सहावी विकेट गमावली आहे. नजीबुल्ला दोन धावा करून झेलबाद झाला. आता नबी आणि रशीद क्रीजवर आहेत.
11 Oct 2023, 17:25 वाजता
IND vs AFG Live Score: अफगाणिस्तानला पाचवा झटका! कप्तान शाहिदी आऊट
IND vs AFG Live Score: कप्तान शाहिदीने 80 रन्सवर आऊट झाला कुलदीप यादवने शाहिदीला बाद करु आजच्या मॅचमध्ये पहिली विकेट घेतली.
11 Oct 2023, 16:56 वाजता
IND vs AFG Live Score: 37 ओव्हरनंतर अफगाणिस्तानची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा आहे. कर्णधार शाहिदी आणि मोहम्मद नबी खेळत आहेत.