IND vs AFG Live Score: आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये भारताचा सामना आज अफगाणिस्तानशी होत आहे. दोन्ही देशांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता हा सामना खेळवला जाईल. हा सामना जिंकून भारत स्पर्धेतील आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे.
11 Oct 2023, 16:46 वाजता
अफगाणिस्तानला चौथा झटका! बर्थ डे बॉय हार्दिकने सेट झालेल्या अझमतला केलं बोल्ड
अफगाणिस्तानचा संघ मोठी धावसंख्या उभारण्याच्या तयारीत असतानाच खेळपट्टीवर सेट झालेला अझमतुल्ला ओमारझाई बाद झाला. हार्दिक पंड्याने हाशमतुल्ला शाहिदी आणि अझमतुल्ला ओमारझाईची जोडी फोडली आहे. 69 बॉलमध्ये 62 धावा करुन अझमतुल्ला बाद झाला.
11 Oct 2023, 16:31 वाजता
31 व्या ओव्हरला अफगाणिस्तानच्या 150 धावा पूर्ण
सामन्यातील 31 व्या ओव्हरला अफगाणिस्तानच्या 150 धावा पूर्ण केल्या आहेत. मैदानात हाशमतुल्ला शाहिदी आणि अझमतुल्ला ओमारझाईची जोडी जमली असून दोघांनाही संघाच्या 150 धावा झाल्या तेव्हा वैयक्तिक स्तरावर 40 हून अधिक धावांचा टाप्पा ओलांडलेला आहे. अझमतुल्लाने अर्धशतक झळकावलं आहे.
11 Oct 2023, 15:59 वाजता
अफगाणिस्तानच्या 100 धावा पूर्ण! 24 ओव्हरमध्ये झळकावलं शतक! संघाने शतक झळकावलं त्यावेळी मैदानात हाशमतुल्ला शाहिदी आणि अझमतुल्ला ओमारझाई फलंदाजी करत आहेत.
11 Oct 2023, 15:57 वाजता
अफगाणिस्तानच्या 100 धावा पूर्ण! 24 ओव्हरमध्ये झळकावलं शतक
11 Oct 2023, 15:18 वाजता
लॉर्ड शार्दुलची कमाल! पहिल्याच चेंडूवर घेतील विकेट
आर. अश्वीनच्या जागी शार्दुल ठाकरुला संघात स्थान मिळालं असून त्याने आपल्या पहिल्याच चेंडूवर रेहमत शाह पायचित झाला. शाहने रिव्ह्यू घेतला पण त्याचा फायदा झाला नाही.
11 Oct 2023, 15:09 वाजता
रेहमानुल्ला झेलबाद
रेहमानुल्ला गुरुबाज बाद! हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या नादात रेहमानुल्लाने मारलेला चेंडू उंचावरुन अगदी सीमारेषेजवळ गेला. मात्र तेथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या शार्दुल ठाकूरने अप्रतिम झेल पकडला. रेहमानुल्ला 21 धावा करुन बाद झाला. संघाची धावसंख्या 63 वर असतानाच रेहमानुल्ला बाद झाला.
11 Oct 2023, 14:54 वाजता
सातव्या ओव्हरमध्ये भारताला पहिलं यश. सलामीवर इब्राहिम झॅड्रॅन जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर विकेटकीपर के. एल. राहुलकरवी झेलबाद झाला. 10 ओव्हरनंतर अफगाणिस्तानचा स्कोअर 48 वर 1 बाद असा आहे.
11 Oct 2023, 14:22 वाजता
अफगाणिस्तानची सावध सुरुवात! पहिल्या 4 ओव्हरनंतर अफगाणिस्तानच्या बिनबाद 18 धावा
11 Oct 2023, 13:40 वाजता
भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. भारतीय फिरकीपटू आर. अश्वीनला संघात स्थान देण्यात आलं नसून त्याच्याऐवजी आजच्या सामन्यात शार्दुल ठाकूर खेळणार आहे.
11 Oct 2023, 13:33 वाजता
अफगाणिस्तानने टॉस जिंकला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.