IND vs AFG Live Score: आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये भारताचा सामना आज अफगाणिस्तानशी होत आहे. दोन्ही देशांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता हा सामना खेळवला जाईल. हा सामना जिंकून भारत स्पर्धेतील आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे.
11 Oct 2023, 12:36 वाजता
भारत आणि अफगाणिस्तान यापूर्वी 3 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 2 सामने भारताने जिंकलेत तर एका सामन्यात अफगाणिस्तानला विजय मिळाला आहे. दोन्ही संघांमधील शेवटचा एकदिवसीय सामना 2019 ला साऊथ हॅम्टनमध्ये पार पडला. हा सामना भारताने 11 धावांनी जिंकला होता.
11 Oct 2023, 11:47 वाजता
IND vs AFG Live Score Updates: कोहली घरच्या मैदानावर खेळणार
विराट कोहली वर्ल्ड कप 2023 चा सामना त्याच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. घरच्या मैदानावर कोहली कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
11 Oct 2023, 11:24 वाजता
IND vs AFG Live Score Updates: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, किशन, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर यांनी नेट सत्रात चांगला वेळ दिला. या फलंदाजांनी नेट गोलंदाजांसमोर सराव केला.
11 Oct 2023, 09:38 वाजता
IND vs AFG Live Score Updates: भारत-अफगाणिस्तान पीच रिपोर्ट
अरुण जेटली स्टेडियमच्या पीचवर सामान्यत: जास्त धावा केल्या जातात. गेल्या सामन्यात या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेने 400 धावांचा टप्पा ओलांडला होता.
11 Oct 2023, 09:03 वाजता
IND vs AFG Live Score Updates: स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्ही भारत आणि अफगाणिस्तान सामना टीव्हीवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये विनामूल्य पाहू शकता.
11 Oct 2023, 07:51 वाजता
अफगाणिस्तानची संभाव्य प्लेईंग 11
रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.
11 Oct 2023, 06:51 वाजता
IND vs AFG Live Score Updates: कशी आहे भारताची प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.