Mahira Sharma: 'या' क्रिकेटपटूचे नाव घेताच लाजली माहिरा शर्मा; नेटिझन्सने केला कमेंट्सचा वर्षाव

Mahira Sharma: माहिरा शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जेव्हा तिला आवडत्या क्रिकेटरबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने एक छान प्रतिक्रिया दिली. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल झाला आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Mar 1, 2025, 11:46 AM IST
Mahira Sharma: 'या' क्रिकेटपटूचे नाव घेताच लाजली माहिरा शर्मा; नेटिझन्सने केला कमेंट्सचा वर्षाव

Mahira Sharma blushes on favourite cricketer question: 'बिग बॉस 13' ची स्पर्धक आणि अभिनेत्री माहिरा शर्मा अनेक कारणांनी चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होत आहे. या व्हिडीओमध्ये माहिराला पापाराझींने स्पॉट केलं. पापाराझीशी बोलताना तिला आवडत्या क्रिकेटरबद्दल विचारले जाते. त्यावेळी ती जी प्रतिक्रिया देते ती व्हायरल झाली आहे. आता नेटिझन्स या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत आणि मजेदार कमेंट्सही करत आहेत.

Add Zee News as a Preferred Source

माहिराला तिच्या आवडत्या क्रिकेटरचे नाव विचारल्यावर काय म्हणाली? 

व्हायरल व्हिडीओमध्ये माहिरा शर्मा पापाराझींना फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. यादरम्यान पापाराझींनी तिला विचारले की "तुझा आवडता क्रिकेटर कोणता?" पापाराझींच्या या प्रश्नावर अभिनेत्री म्हणाली- “संपूर्ण भारतीय टीम"  यानंतर पापाराझीने सिराज... सिराज असे ओरडायला सुरुवात केली आणि त्यानतंर माहिराने गोड हसत कोणतीही प्रतिक्रिया न देता आत गेली.

हे ही वाचा: "भारत तुम्हाला पगार देत आहे...", सुनील गावस्कर अचानक संतापले, वक्तव्याने उडाली खळबळ

नेटिझन्सनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओखाली कमेंट करत नेटिझन्सने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, “ती लाजताना दिसत आहे जेणेकरून तिच्यावर लोकांना  संशय येईल आणि प्रसिद्धी मिळेल.” दुसऱ्या यूजरने लिहिले, “सिराजचे नाव ऐकून लाजली.” तर तिसऱ्याने लिहिले, "...प्यारी समझ गई." अशाच प्रकारच्या नेटिझन्सनी ही भरपूर कमेंट्स केल्या.

हे ही वाचा: क्रिकेटर मोहम्मद सिराज करणार लग्न? अभिनेत्रीच्या आईने केले स्पष्ट

 

हे ही वाचा: IND vs NZ: रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीबाबत खेळणार की नाही? केएल राहुलने दिले उत्तर

दोघेही डेट करत असल्याची पसरली होती अफवा 

काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस 13' ची स्पर्धक माहिरा शर्मा आणि क्रिकेटर मोहम्मद सिराज डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. यावर ना अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली ना क्रिकेटरने प्रतिक्रिया दिली होती. मात्र, माहिराच्या आईने टाईम्स नाऊला सांगितले की, "तुम्ही काय बोलताय? लोक काहीही बोलतात. आता माझी मुलगी सेलिब्रिटी आहे, लोक तिचे नाव कोणाशीही जोडतील, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का?" असे म्हणत त्यांनी हे वृत्त पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले होते.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More