MCA Election 2025 : बुधवार 12 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशन कार्यकारी समितीची त्रैवार्षिक (2025-28) निवडणूक पार पडणार आहे. कार्यकारी समितीमधील विविध पदांसाठी ही निवडणूक होणार असून या निवडणुकीत जेष्ठ नेते शरद पवार आणि मंत्री आशिष शेलार हे एकत्र आले आहेत. 'पवार-शेलार' पॅनलमधील उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा यासाठी आशिष शेलारांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी उत्सुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे सोमवारी अजिंक्य नाईक यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यामुळे आता उर्वरित पदांसाठी निवडणूक होणार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी बुधवारी 3 ते 6 या वेळेत मतदान होणार आहे. शरद पवार आणि आशीष शेलार गटाने त्यांच्या उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर केली. यात पदाधिकाऱ्यांमध्ये बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड (उपाध्यक्ष), गौरव पय्याडे (सहसचिव) आणि अरमान मलिक (खजिनदार) यांचा समावेश आहे. कार्यकारिणी सदस्यांमध्ये आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह विघ्नेश कदम, विकास रेपाळे, प्रमोद यादव, भूषण पाटील, संदीप विचारे, मंगेश साटम, सूरज समत आणि मौलिक मर्चट यांना पुरस्कृत केले आहे. गव्हर्निंग कौन्सिलसाठी राजदीप गुप्ता (अध्यक्ष) आणि किशोर जैन (सदस्य) यांना पाठिंबा दिला.
उपाध्यक्ष - जितेंद्र आव्हाड विरुद्ध नविन शेट्टी
सचिव - शाह आलम शेख विरुद्ध डॉ. उन्मेष खानविलकर
सहसचिव - गौरव पयाडे विरुद्ध निलेश भोसले
खजिनदार - अर्मान मलिक विरुद्ध सुरेंद्र शेवाळे
कार्यकारी परिषद सदस्य - 11 पदांसाठी 20 उमेदवार मैदानात आहेत
आजपर्यंत आम्ही सगळ्यांनीच मा. शरद पवार साहेब असो, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असो, या सगळ्यांच्याच नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली क्रिकेटच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहोत. यामध्ये पक्षीय भेद कधीच न बाळगता ही निवडणूक आपण लढत आहोत. म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA)… pic.twitter.com/V9hibDZOXk
Adv. Ashish Shelar ॲड. आशिष शेलार (ShelarAshish) November 11, 2025
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या अनेक राजकीय नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. भाजपाचे नेते प्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांचा यात समावेश होता. मंत्री प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांनीही अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक असताना भाजप नेते प्रसाद लाड हे सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी एमसीएच्या कार्यालयात पोहोचले. त्यांची अध्यक्ष दालनात अजिंक्य नाईक यांचासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसाद लाड यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील त्यांचा अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे अजिंक्य नाईक यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांची पुन्हा एकदा बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली.
मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक कधी होणार आहे?
मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक बुधवार, 12 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत कोणत्या पदांसाठी मतदान होणार आहे?
उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार आणि कार्यकारी परिषद सदस्य पदांसाठी मतदान होणार आहे.
सचिव पदासाठी कोण कोण मैदानात आहेत?
शाह आलम शेख विरुद्ध डॉ. उन्मेष खानविलकर
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.