MI vs RCB IPL 2026 : मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या चालू सामन्यात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित शर्माला मैदान सोडावे लागले. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी आला आहे.

Rohit Sharma out due to hamstring/quad problem : इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा २० वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला जात आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यामध्ये नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना, आरसीबीने २० षटकांत ४ गडी गमावून २४० धावा केल्या. सध्या मुंबई इंडियन्सची फलंदाजी सुरू आहे आणि या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याला चालू सामना सोडून मैदान सोडावे लागले आहे. मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला आहे. हॅमस्ट्रिंग/क्वाडच्या संभाव्य दुखापतीमुळे रोहित शर्मा दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला. पॉवरप्लेच्या अखेरीस मुंबईने एकही विकेट न गमावता केवळ ६२ धावा केल्या आहेत.
आरसीबीने 20 षटकांत 4 गडी गमावून 240 धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्स आता 241 धावांचा पाठलाग करत आहे. फिल सॉल्टने ३६ चेंडूंमध्ये ७८ धावा केल्या. विराट कोहलीने ५० धावांचे, तर कर्णधार रजत पाटीदारने ५३ धावांचे योगदान दिले. अखेरीस, टीम डेव्हिडने १६ चेंडूंमध्ये नाबाद ३४ धावा केल्या. चाहत्यांचे लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर आहे. दोन्ही संघ मागील सामन्यांमध्ये पराभूत झाले आहेत. रजत पाटीदार आणि हार्दिक पांड्या विजयासह पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असतील.
आरसीबीच्या संघाने पहिले फलंदाजी केल्यानंतर आता सध्या संघ गोलंदाजी करत आहे. पण या दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहली फिल्डिंगसाठी मैदानात आला नाही. क्रिकबझच्या माहितीनुसार अॅन्कलचा त्रास होत असल्यामुळे विराट कोहली मैदानात आला नाही.
Rohit Sharma retires hurt with a suspected hamstring/quad problem
— Cricbuzz (@cricbuzz) April 12, 2026
Virat Kohli is off the field with an ankle issue pic.twitter.com/YP1Fz8HnMP
मुंबई इंडियन्सने १९व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. मात्र, पाच वेळच्या या विजेत्या संघाने आपले पुढचे दोन सामने गमावले. गुणतालिकेमध्ये सध्या मुंबई इंडियन्सचा संघ सध्या आठव्या क्रमांकावर आहे संघाच्या खात्यामध्ये आतापर्यत 3 सामन्यानंतर फक्त 2 गुण आहेत.
आरसीबीने आयपीएल २०२६ ची सुरुवात सलग दोन विजयांनी केली. मात्र, शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीला ६ गडी राखून पराभूत केले. संघ गुणतालिकेमध्ये सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. संघाच्या खात्यामध्ये आतापर्यत 4 गुण आहेत.