MI vs RR: रोहित शर्मा Out की Not Out? अंपायरच्या निर्णयावरून मोठा वाद; Video पाहून तुम्हीच सांगा!
Match Fixing, Viral Video: संदीप शर्माच्या बॉलवर कॅच झेलत असताना संजूचा हात विकेट्सला लागतो आणि स्टंप्सच्या लाईट्स लागतात. त्यामुळे रोहितला आऊट (Rohit Sharma Out) देण्यात आलं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
Rohit Sharma, MI vs RR: आयपीएल 2023 मध्ये 42 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Mumbai Indians vs Rajasthan Royals) या दोन संघात संपन्न पडला. या सामन्यात राजस्थानचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) मुंबईच्या गोलंदाजांना लोळवत आयपीएलमध्ये पहिलं शतक ठोकलं आणि टीम इंडियासाठी दरवाजे खटखटवले आहेत. मात्र, टीम डेव्हिडच्या (Tim David) आक्रमक खेळीसमोर राजस्थानला पराभव स्विकारावा लागला आहे. आयपीएलचा हा सामना फिक्स (Match Fixing) असल्याचा आरोप आता करण्यात येतोय. सोशल मीडियावर यावर तुफान चर्चा होत असल्याने सर्वांचे डोळे चक्रावले आहेत.
मुंबई-राजस्थान सामना तसा खास राहिला. हा सामना आयपीएलमधील 1000 वा (IPL 1000th Match) सामना होता. तसेच कॅप्टन रोहित शर्माच्या वाढदिवसादिवशी हा सामना खेळवण्यात आला होता. त्याचबरोबर रोहित शर्माचा हा 150 वा आयपीएल सामना देखील होता. मात्र, नेहमीप्रमाणे वाढदिवसादिवशी रोहितचा फ्लॉप शो दिसून आला. राजस्थानविरुद्ध रोहितला 5 बॉलमध्ये केवळ 3 धावा करता आल्या आहेत. संदीप शर्माच्या (Sandeep Sharma) या परफेक्ट बॉलवर रोहित शर्मा क्लिन बोल्ड झाला. मात्र, सध्या रोहितच्या विकेटचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतोय.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा बॅटिंग करताना दिसतोय, तर दुसरीकडे विकेटमागे संजू उभा आहेत. संदीप शर्माच्या बॉलवर कॅच झेलत असताना संजूचा हात विकेट्सला लागतो आणि स्टंप्सच्या लाईट्स लागतात. त्यामुळे रोहितला आऊट (Rohit Sharma Out) देण्यात आलं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. तर मुंबईच्या समर्थकांचा पारा सातव्या आसमानावर पोहोचला आहे.
पाहा Video
दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला बाद करण्याचा निर्णय देताना अंपायरकडून मोठी चूक झाल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळे राजस्थान आणि मुंबईचे समर्थक आमने सामने आले आहेत. नवख्या शेख राशीद (Shaik Rasheed) याच्या कॅचवरून देखील मोठा वाद निर्माण झाला होता. राशीदच्या अफलातून कॅचचं कौतूक झालं पण, अंपायर्सच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.