रोहित शर्मानं पहिल्याच भेटीत किस केलं, मॉडेल सोफिया हयातचा दावा
`कॉफी विथ करण` या कार्यक्रमात भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी महिला आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली.
मुंबई : 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी महिला आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली. यानंतर दोन्ही खेळाडूंचं चौकशी होईपर्यंत निलंबन करण्यात आलं. हे सगळं प्रकरण ताजं असतानाच आता रोहित शर्माही वादात सापडण्याची शक्यता आहे. मॉडेल सोफिया हयात यानं रोहित शर्माबद्दल वादग्रस्त दावा केला आहे. बिग बॉसमध्ये स्पर्धक राहिलेली सोफिया हयात कायमच चर्चेत असते. यावेळी तिनं रोहित शर्मावर निशाणा साधला आहे. रोहित शर्मा आणि रितिका सचदेह यांचा २०१५ साली विवाह झाला. काहीच दिवसांपूर्वी या दोघांना मुलगी झाली आहे.
सोपिया हयात हिनं स्पॉटबॉयला मुलाखत दिली आहे. माझ्या आयुष्यावर पुस्तक लिहित असल्याचं सोफियानं या मुलाखतीमध्ये सांगितलं. या पुस्तकात मी माझ्या आणि रोहितच्या नातेसंबंधांबद्दलही लिहिलं असल्याचं सोफिया म्हणाली. आम्ही दोघं पहिल्यांदा लंडनमध्ये एका क्लबमध्ये भेटलो. रोहितनं पहिल्या भेटीतच मला किस केलं, असा दावा सोफियानं केला आहे.
मी क्लबमध्ये डान्स करत असताना एका मित्रानं माझी आणि रोहित शर्माची भेट घडवून आणली. मी जास्त क्रिकेट बघत नसल्यामुळे रोहितला मी ओळखत नव्हते. या भेटीदरम्यान आम्ही एकमेकांशी गप्पा मारल्या आणि लगेच आम्ही क्लबमधल्या एकांत असलेल्या ठिकाणी गेलो. यानंतर सगळं खूप लवकर झालं. रोहितनं मला तिकडे किस केलं. यानंतर आम्ही एकत्र डान्स केला, असं सोफिया म्हणाली आहे.
सोफियानं या मुलाखतीमध्ये रोहित आणि तिचं ब्रेकअप का झालं? यावरही भाष्य केलं आहे. आमच्या दोघांमध्ये सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण एक दिवस रोहितनं माध्यमांसमोर माझी ओळख एक फॅन म्हणून करून दिली. यामुळे मला दु:ख झालं आणि मग आम्ही दोघांनी आमचे मार्ग वेगळे केले, अशी प्रतिक्रिया सोफियानं दिली आहे.
सोफियाच्या या दाव्यानंतर तिच्यावर सोशल मीडियावर टीकाही होत आहे. काही जणांनी सोफियाला जुनी ट्विट दाखवली ज्यामध्ये तिचं नाव विराट कोहलीसोबत जोडलं गेलं होतं. रोहितसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं सोफियानं कबुल केलं असलं तरी विराटबद्दल सोफियानं काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. जुनी ट्विट फोटोशॉप केली असल्याचंही सोफियाचं म्हणणं आहे.