IPL 2025 : भारत पाकिस्तान तणाव परिस्थितीमुळे एका आठवड्यासाठी आयपीएल 2025 (IPL 2025) स्थगित करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा 17 मे पासून आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात करण्यात आलेली असून शनिवार आणि रविवारी दोन दिवस तीन सामने खेळवण्यात आले. 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेऊन पाकिस्तानातील 9 दहशतवादी स्थळ उध्वस्त केली. मात्र भारताने पाकिस्तानवर जेव्हा ऑपरेशन सिंदूर राबवलं तेव्हा आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये खेळणाऱ्या एका स्टार क्रिकेटरचे आई वडील पाक व्याप्त काश्मीरमध्ये होते.
स्टार क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नसून मोईन अली आहे. मोईन अली हा इंग्लंडचा क्रिकेटर असला तरी तो मूळचा पाकिस्तानचा आहे. मोईन अलीने बियर्ड बिफोर विकेट पॉडकास्टवर म्हंटले की, 'माझे आई वडील तेव्हा पाक व्याप्त काश्मीरमध्ये होते जिथे हल्ला झाला होता. तिथून जवळपास एक तासांच्या अंतरावर बहुदा. मग ते त्याच दिवशी एकमात्र फ्लाईट पकडून निघण्यास यशस्वी झाले. मला या गोष्टीचा आनंद आहे की ते त्याचं दिवशी पाकिस्तानातून निघण्यास यशस्वी झाले. पण तो वेडेपणा होता'. जेव्हा आयपीएल एक आठवड्यासाठी थांबवण्यात आलं तेव्हा मोईन अली ने हा अनुभव शेअर केला'.
हेही वाचा : 'तो पेल दुंगा', अंपायरच्या एका निर्णयानंतर कुलदीप यादवचा थयथयाट; DC VS GT सामन्यात नेमकं काय घडलं?
मोईन अली म्हणाला की, 'हा वेडेपणाच होता. वरवर पाहता, सर्व काही खरोखर सुरू होण्यापूर्वी काश्मीर (पीओके) मध्ये हल्ले झाले. मग थोड्या वेळात गोष्टी वेगाने वाढल्या आणि अचानक आम्ही त्याच्यामध्ये आलो'. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामन्यानंतर मोईन अलीने हा अनुभव सांगितलं. 8 मे रोजी ब्लॅकआउटमुळे धर्मशाला स्टेडियमवरील सामना अचानकपणे थांबवण्यात आला आणि मग रद्द करण्यात आला होता. मोईन अली म्हणाला की, 'असं वाटलं कि आम्ही कोणत्या युद्धाच्या मध्ये आहोत. पण आम्ही काहीही ऐकलं नाही (जसं मिसाईल हमला). असं काही झाल्यावर तुम्ही अचानकपणे देशातून बाहेर पडण्यासाठी झटपटता, फक्त तुम्हाला निश्चित करायचं असतं की तुमचं कुटुंब ठीक आहे. लोक तुमच्या विषयी घरात चिंतीत आहेत. अशावेळी तुम्हीं फक्त ही अपेक्षा करता की सर्व ठीक व्हावं' .
मोईन अली म्हणाली, 'लोकांना काय घडत आहे हे माहित नव्हतं. मी बर्याच लोकांशी बोललो. त्यातील काहीजण म्हणाले, 'युद्ध होणार नाही; सर्व काही ठीक होईल. या गोष्टी यापूर्वी घडल्या आहेत. पण आम्हाला ज्या गोष्टीची सर्वात जास्त चिंता होती ती म्हणजे विमान रद्द होणं आणि बाहेर जाता न येणं'.