मोहम्मद अझरुद्दीनची पहिली पत्नी कोण?, घटस्फोटानंतर कोणाशी केलं तिसरं लग्न? जाणून वाटेल आश्चर्य!

Mohammad Azharuddin 1st Wife: अझरुद्दीनची पहिली पत्नी कोण होती? अझरुद्दीनला घटस्फोट दिल्यानंतर तिने तिसर लग्न कोणाशी केलं? याबद्दल जाणून घेऊया.

प्रविण दाभोळकर | Updated: Jun 18, 2025, 03:09 PM IST
मोहम्मद अझरुद्दीनची पहिली पत्नी कोण?, घटस्फोटानंतर कोणाशी केलं तिसरं लग्न? जाणून वाटेल आश्चर्य!
मोहम्मद अझरुद्दीन

Mohammad Azharuddin 1st Wife: टीम इंडियाा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनची कारकीर्द अनेक अफवांनी भरलेली होती. वेगवेगळ्या महिलांशी असलेले संबंध असोत किंवा मॅच फिक्सिंगचे आरोप असोत, अझरुद्दीन नेहमीच चर्चेत टॉपवर राहिला. दरम्यान अझरुद्दीनची पहिली पत्नी कोण होती? अझरुद्दीनला घटस्फोट दिल्यानंतर तिने तिसर लग्न कोणाशी केलं? याबद्दल जाणून घेऊया.

पहिले लग्न 9 वर्षे टिकले

मोहम्मद अझरुद्दीनचे अनेक सुंदर तरुणींशी संबंध होते. पण त्याचे पहिले लग्न नौरीनशी झाले होते. पण हे लग्न फक्त 9 वर्षे टिकले आणि या जोडप्याचा घटस्फोट झाला. या जोडप्याला मोहम्मद असदुद्दीन आणि मोहम्मद अयाजुद्दीन अशी दोन मुले देखील आहेत.

नौरीन 16 वर्षांची

1987 मध्ये या जोडप्याचे लग्न झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या वेळी नौरीन फक्त 16 वर्षांची होती. बॉलिवूड स्टार प्राची देसाईने इमरान हाश्मी अभिनीत बायोपिक 'अझहर' मध्ये नौरीनची भूमिका केली होती.

1996 मध्ये घटस्फोट 

1996 मध्ये नौरीन आणि मोहम्मद अझरुद्दीन यांचा घटस्फोट झाला. घटस्फोट घेतल्यानंतर नौरीनने कॅनेडियन रिअल इस्टेट व्यावसायिकाशी लग्न केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर 2010 मध्ये नौरीनने लंडनमधील एका मुस्लिम समुदायाच्या नेत्याशी तिसरे लग्न केले.

तिसऱ्या लग्नापासून मुलगा

नौरीनला तिच्या तिसऱ्या लग्नापासून एक मुलगा आहे, जो मोहम्मद असदुद्दीनचा (चित्रात) सावत्र भाऊ आहे. बॉलिवूड स्टार संगीता बिजलानी मोहम्मद अझरुद्दीनची दुसरी पत्नी होती. 3 वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी 1996 मध्ये लग्न केले.

मॅच फिक्सिंगमुळे कारकीर्द उध्वस्त 

मोहम्मद अझरुद्दीन 2000 मध्ये मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी घेरला गेला आणि त्यानंतर त्याची क्रिकेट कारकीर्द संपली. त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. 2012 मध्ये अझरवरील ही बंदी उठवण्यात आली. पण तोपर्यंत अझरची कारकीर्द संपली होती.

अझरुद्दीनचा राजकारणात प्रवेश

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि मुरादाबादचे माजी खासदार मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा असदुद्दीन आता राजकारणात आलाय. अलिकडेच अझरुद्दीनचा मुलगा असदुद्दीनची तेलंगणा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. मला राजकारणातून जनतेची सेवा करायचीय आणि यासाठी माझे वडील आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे त्याने सांगितले. मला लोकांमध्ये राहायचय आणि लोकांची सेवा करायचीय. जर माझ्या कामामुळे लोकांच्या जीवनात काही सकारात्मक बदल घडला तर मला खूप समाधान मिळेल, असेही त्याने सांगितले.35 वर्षीय असदुद्दीन एकेकाळी हैदराबाद कोल्ट्स इलेव्हन आणि गोवा सारख्या संघांसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलाय. आता तो राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाले आहेत.

असदुद्दीनने क्रिकेट का सोडले?

मोहम्मद असदुद्दीनची क्रिकेट कारकीर्द फक्त ११ दिवस टिकली. तो फक्त दोन प्रथम श्रेणी सामने खेळू शकला. असदुद्दीन एक यशस्वी वकील आहे आणि त्याच्याकडे लाखोंची मालमत्ता आहे. क्रिकेटला विश्राम का दिला असे विचारल्यावर तो म्हणाला, 'खेळाडूची कारकीर्द मर्यादित असते. वेळ आणि परिस्थिती मोठी भूमिका बजावते. मला वाटलं की माझा क्रिकेटचा अध्याय संपलाय. आणि आता मला माझी ऊर्जा एका नवीन दिशेने लावायचीय'.