Virat Kohli Test Retirement : भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने 12 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधून अचानकपणे घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयाने फॅन्समध्ये खळबळ उडाली. विराटने यापूर्वी 2024 मध्ये टी 20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. विराटच्या टेस्ट निवृत्तीवर जगभरातील दिग्गज क्रिकेटर्स आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुद्धा विराटच्या निवृत्तीबाबत पोस्ट लिहिल्या. भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याने मोठं वक्तव्य करत म्हटलं आहे की, विराटला अजून खेळायचं होतं पण त्याला बीसीसीआय आणि सिलेक्टर्सकडून हवा तसा सपोर्ट मिळाला नाही. ज्याची त्याला अपेक्षा होती'.
12 मे रोजी इंस्टाग्राम अकाउंटवर विराटने पोस्ट शेअर करून तो टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले. याच्या 5 दिवसांपूर्वी भारताचा टेस्ट कर्णधार रोहित शर्माने या फॉरमॅटमधून अचानकपणे निवृत्ती जाहीर केली होती. माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ म्हणाला की, 'मला वाटतं की त्यांना अजून या फॉरमॅटमध्ये खेळायचं होतं. त्यांचं बीसीसीआय सोबत काही बोलणं झालं असेल, पण सिलेक्टर्सनी मागील 5 ते 6 वर्षांचा त्यांचा फॉर्म पाहून त्यांना सांगितले असावे की आता तुमची संघात जागा नाही. खरंच काय घडलं हे आपल्याला कधीच कळणार नाही, पण पडद्यामागे काय घडलं याचा अंदाज लावणे खूप कठीण आहे'.
मोहम्मद कैफ पुढे म्हणाला की, 'पण शेवटच्या क्षणी घेतलेला निर्णय आणि त्याची रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याची पद्धत लक्षात घेता, मला वाटते की तो पुढच्या टेस्ट पर्यंत खेळू इच्छित होता. गेल्या काही आठवड्यांतील घडामोडी पाहता, त्याला बीसीसीआय आणि निवड समितीकडून अपेक्षित असलेला पाठिंबा मिळाला नाही, ज्याची त्याला अपेक्षा होती'.
हेही वाचा : Mumbai Indians चा प्लेऑफचा मार्ग मोकळा? दिल्ली कॅपिटल्सला Boycott करण्याची का होतेय मागणी?
विराटने आतापर्यंत क्रिकेटचे तीनही फॉरमॅट मध्ये एकूण 539 सामने खेळले आहेत. विराटने त्याच्या टेस्ट करिअरमध्ये 123 सामन्यांमध्ये एकूण 9230 धावा केल्या आहेत. यात त्याने 30 शतक, 7 द्विशतक आणि 31 अर्धशतक केली आहेत. त्याने 302 वनडे सामन्यात 51 शतकांसह 14181 धावा, टी20 मध्ये 1 शतकासह 4188 धावा केल्या आहेत.