Fact Check: मोहम्मद शमीने इंस्टा स्टोरीवर लावला पाकिस्तानी झेंडा? जाणून घ्या Viral फोटोमागचं सत्य

Mohammed Shami Pakistani Flag: सोशल मीडियावर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या नावाने एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जातोय की त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पाकिस्तानचा झेंडा लावला आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: May 17, 2025, 12:00 PM IST
Fact Check: मोहम्मद शमीने इंस्टा स्टोरीवर लावला पाकिस्तानी झेंडा? जाणून घ्या Viral फोटोमागचं सत्य
Mohammed Shami Pakistani Flag Instagram Story goes Viral

Fact Check of  Mohammed Shami Pakistani Flag Instagram Story:  भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आजकाल सतत चर्चेत आहे. आता तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. सध्या त्यांच्या नावाने एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हायरल फोटोमध्ये दावा केला जातोय की शमीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पाकिस्तानचा झेंडा लावला आहे. या फोटोमुळे अनेक प्रश्न नेटिझन्सला पडले आहेत. खरंच शमीने पाकिस्तानच्या झेंड्याचा फोटो लावला का?  काही नेटिझन्स फार टीक करताना दिसत आहेत. तर काही क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे. मात्र, या व्हायरल फोटो आणि त्याच्या दाव्यामागचं सत्य नक्की काय आहे हे जाणून घेऊयात... 

व्हायरल फोटोचा फॅक्ट चेक (Fact Check)

तुम्ही या व्हायरल फोटोकडे नीट बघितलं तर दिसून येईल की मोहम्मद शमीने अशा प्रकारची कोणतीही इंस्टा स्टोरी पोस्ट केलेली नाही. व्हायरल फोटो खरा नसून तो AI चा वापर करून तयार करण्यात आलेला फेक फोटो आहे. काही नेटिझन्सने हा फोटो एडिट करून सोशल मीडियावर पसरवला आहे. हा फोटो एक प्रकारे दिशाभूल करणारा आहे. यामागे कोणतेही सत्य नाही.  

हे ही वाचा: Shami Retirement: "तुम्ही भविष्याचा सत्यानाश केला..." निवृत्तीच्या अफवांवर मोहम्मद शमींचा संताप

 

हे ही वाचा: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर, 'या' खेळाडूला बनवले कर्णधार! करुण नायरचे झाले दमदार पुनरागमन

उडाली होती निवृत्तीच्या अफवा (Mohammed Shami Test Retirement)

काही दिवसांपूर्वी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर, शमीदेखील टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी मोहम्मद शमीने स्वतः पुढे येत निवृत्तीच्या दाव्यांना खोडून काढले होते. याशिवाय त्याने या अशा खोट्या बातम्यांवर त्याचा चोख शब्दात राग व्यक्त केला होता. शमीने म्हटलं होतं की, “अशा अफवा पसरवणाऱ्यांनी क्रिकेटपटूंच्या भविष्याचं नुकसान केलं आहे.”

हे ही वाचा: वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्माच्या नावे स्टँडचं उद्घाटन, पत्नी रितिका सजदेह झाली भावूक; Video Viral

 

IPL 2025 मध्ये शमीला अजूनही गवसला नाही सूर 

सध्या शमी IPL 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) कडून खेळत आहेत. मात्र, त्यांचा आणि त्यांच्या संघाचा हंगाम फारसा विशेष ठरलेला नाही. SRH आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. शमीने आतापर्यंत ९ सामन्यांमध्ये फक्त ६ विकेट्स घेतल्या आहेत.