)
Asia Cup 2025: टीम इंडियाने आशिया कप 2025 च्या (Asia Cup 2025) फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. मात्र त्यांना अद्याप त्यांच्या हक्काची विजेतेपदाची ट्रॉफी देण्यात आलेली नाही. आशियाई क्रिकेट काउन्सिलचे प्रमुख मोहसिन नक्वीने (Mohsin Naqvi) ही ट्रॉफी दुबईतील एसीसीच्या हेड ऑफिसमध्ये बंद करून ठेवली आहे. एवढंच नाही तर मोहसिन नक्वीने हे सुद्धा निर्देश दिले की भारताला ट्रॉफी देणं तर दूरच पण त्यांच्या परवानगी शिवाय ट्रॉफी जागेवरून हलायला सुद्धा नकोय.
टीम इंडियाने दुबईत 28 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध फायनल जिंकल्यावर एसीसी आणि पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. मोहसिन नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि गृहमंत्री सुद्धा आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तान देशातील तणाव वाढला आहे.
मोहसिन नक्वीच्या एका जवळच्या सूत्राने पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'सध्या आशिया कपची ट्रॉफी दुबईतील एसीसी कार्यालयात आहे आणि नक्वी यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की त्यांच्या परवानगीशिवाय किंवा त्यांची उपस्थिती नसताना ट्रॉफी कोणालाही सोपवली जाऊ नये. नक्वी यांनी स्पष्ट सूचना दिल्या की केवळ तेच वैयक्तिकरित्या ट्रॉफी भारतीय संघाला किंवा बीसीसीआयला (भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला) सुपूर्द करतील.
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीत आशिया कप खेळवण्यात आला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. मोहसिन नक्वीने टीम इंडियाला ट्रॉफी न दिल्याने बीसीसीआयने त्यांच्या या कृतीवर तीव्र आक्षेप घेतला आणि पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या एसीसीच्या बैठकीत बीसीसीआय अधिकाऱ्यांनी मोहसिन नक्वीच्या वागणुकीची टीका केली होती.
विजेतेपदाची ट्रॉफी टीम इंडियाला का दिली नाही?
उत्तर: आशियाई क्रिकेट काउन्सिलचे (एसीसी) प्रमुख मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी दुबईतील एसीसीच्या हेड ऑफिसमध्ये बंद करून ठेवली आहे. त्यांच्या सूचनांनुसार, त्यांच्या परवानगीशिवाय किंवा उपस्थितीशिवाय ट्रॉफी कोणालाही दिली जाणार नाही.
मोहसिन नक्वी कोण आहेत आणि त्यांचं यात काय कनेक्शन आहे?
उत्तर: मोहसिन नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष, एसीसीचे प्रमुख आणि पाकिस्तानचे गृहमंत्री आहेत. त्यांनी वैयक्तिकरित्या ट्रॉफी भारतीय संघाला किंवा बीसीसीआयला सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोहसिन नक्वीच्या सूचना काय आहेत?
उत्तर: मोहसिन नक्वी यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, ट्रॉफी जागेवरून हलवली जाऊ नये आणि केवळ ते वैयक्तिकरित्या ती भारतीय संघाला किंवा बीसीसीआयला देतील. हे त्यांच्या एका जवळच्या सूत्राने पीटीआयला सांगितलं आहे.