Rishabh Pant : भारताचा स्टार फलंदाज आणि विकेटकिपर ऋषभ पंत (Rishabh Pant) याची बहीण साक्षी ही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. यासाठी ऋषभ स्वतः चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर थेट घरी परतला तर मंगळवारी लग्नापूर्वी झालेल्या संगीत सोहळ्यात एम एस धोनी आणि सुरेश रैना सारखे माजी क्रिकेटर सुद्धा दिसून आले. पंतच्या बहिणीच्या लग्नात धोनी (MS Dhoni) आणि रैनाने (Suresh Raina) पंजाबी गाण्यांवर ठेका धरून बेभान होऊन डान्स केला. सध्या याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी, रैना आणि पंत हे तिघे काही मित्रमंडळींसोबत 'दमा दम मस्त कलंदर' या गाण्यावर नाचताना दिसतायत. मसूरी मध्ये बुधवारी पंतच्या बहिणीचं लग्न असून बिझनेसमन असलेल्या अंकित चौधरी सोबत मागील वर्षी जानेवारी महिन्यात तिचा साखरपुडा झाला होता. अंकित हा लंडनच्या एलीट ई 2 कंपनीचा बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे. पंतची बहीण साक्षी आणि अंकित हे दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात.
हेही वाचा : IPL 2025 च्या सुरुवातीच्या मॅचमधून बाहेर राहणार 3 खेळाडू, मुंबई इंडियन्समधील दोघांचा समावेश
एम एस धोनीची पत्नी साक्षी सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. तिने ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नातील काही खास क्षण फोटो आणि व्हिडीओद्वारे शेअर केले. मसुरीमध्ये सुरु असलेल्या या लग्नसोहोळ्यात साक्षी सुद्धा धोनी सोबत पोहोचली असून सुरेश रैना सुद्धा आपल्या पत्नी सोबत या सोहळ्यात सामील झाला आहे. लग्नापूर्वी झालेल्या संगीत सोहळ्यात धोनी पंजाबी गाण्यांवर थिरकताना दिसला. पंतने बहीण साक्षीच्या लग्नात जवळील नातेवाईक, कुटुंबातील व्यक्ती आणि काही खास पाहुण्यांनाच आमंत्रित केलं आहे.
Rishabh Pant , MS Dhoni & Suresh Raina dancing together pic.twitter.com/b03FSVUvGv
Riseup Pant (riseuppant17) March 11, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यावर टीम इंडियाचे खेळाडू हे आपापल्या घरी परतले. तसेच काहीच दिवसात आयपीएलचा 18 वा सीजन सुरु होणार असल्याने काही खेळाडूंनी संघांचे प्रॅक्टिस कॅम्प सुद्धा जॉईन केले आहेत. ऋषभ पंत मागील काही वर्ष दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता. मात्र आयपीएल 2025 पूर्वी त्याला रिटेन करण्यात आले नाही. मेगा ऑक्शनमध्ये पंतला लखनऊ सुपर जाएंट्सने तब्बल 27 कोटींना विकत घेतले. ऋषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More
LIVE|
LES
35/3(10 ov)
|
VS |
BOT
|
| Full Scorecard → | ||
|
MAS
(19 ov) 131/7
|
VS |
BRN
135/3(17.1 ov)
|
| Bahrain beat Malaysia by 7 wickets (DLS method) | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(19 ov) 131/7
|
VS |
NEP
135/3(17.1 ov)
|
| Match Postponed | ||
| Full Scorecard → | ||
|
LES
(19.3 ov) 60
|
VS |
BOT
61/4(11 ov)
|
| Botswana beat Lesotho by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.