Yograj Singh : भारताचे माजी क्रिकेटर आणि स्टार फलंदाज युवराज सिंहचे वडील योगराज सिंह हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. महेंद्र सिंह धोनीबाबत योगराज अनेकदा तिखट प्रतिक्रिया देतात आणि युवराजचं करिअर लवकर संपण्यासाठी ते अनेकदा धोनीला दोष देतात. योगराज सिंह (Yograj Singh) यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी धोनी (MS Dhoni) , विराट कोहली, रोहित शर्मा, अर्जुन तेंडुलकर आणि कपिल देव (Kapil Dev) इत्यादींबाबत भाष्य केलं.
माजी क्रिकेटर असलेल्या योगराज सिंह यांना तरुवर कोहली मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारला की, जर ते टीम इंडियाचे हेड कोच असते तर त्यांनी संघात काय बदल केले असते? त्यावर योगराज म्हणाले की, 'जर मी अशी टीम इंडिया बनवेन जी अनेक वर्ष कोणाही विरुद्ध हरणार नाही'. योगराज पुढे म्हणाले की, 'जर कोणी चांगलं परफॉर्म करत नसेल तर लगेच बोललं जातं रोहितला हटवा, कोहलीला हटवा, कोणालाही का हटवायचे? ते वाईट काळातून जात असतील तर त्यांची मदत करा. मी तर त्यांना म्हणेन या माझ्या मुलांनो मी तुमच्या सोबत आहे, चला रणजी खेळू, चला थोडी प्रॅक्टिस करू. रोहितला म्हणेन चल 20 किलोमीटर धाउयात, ट्रेकिंगला जाऊयात. पण कोणीही असं काही करायला तयार नाही प्रत्येक जणांना त्यांना बाहेर काढायचे आहे'. अर्जुन तेंडुलकरबाबत योगराज म्हणाले की, त्याला मी 6 महिन्यांच्या आत जगातला सर्वोत्कृष्ट फलंदाज बनवेन.
हेही वाचा : IPL 2025 मध्ये 'या' क्रिकेटरची बॅटिंग पाहून सौरव गांगुली झाला इम्प्रेस, BCCI ला टॅग करत केली विनंती
मुलाखतीत योगराज सिंहने महेंद्र सिंह धोनीबाबत सुद्धा प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, रोहित कोहली अशी लोक नाहीत ज्यांना तुम्ही बाहेर करता, ते असे लोक आहेत ज्यांची तुम्ही काळजी घेता त्यांची केअर करता, त्यांना प्रेम देता. मी कधी त्यांच्यात आणि युवराज सिंहमध्ये अंतर केलं नाही. उदाहरण द्यायचं झालं तर एम एस धोनी सोबत सुद्धा असंच आहे, मी त्याला आपल्या मुलाप्रमाणे मानतो पण जे चुकीचं आहे ते चुकीचच आहे.
धोनी प्रमाणे कपिल देवबाबत सुद्धा योगराज सिंह यांनी अनेकदा तिखट प्रतिक्रिया देताना दिसतात. मात्र या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मी कपिल देववरही माझं प्रेम आहे, पण त्याने जे केलं ते चुकीचं आहे, फक्त याला स्वीकारा. जेव्हा मला समजलं की त्याला हार्ट अटॅक आला आहे तेव्हा मी त्वरित दिल्लीला गेलो आणि खूप रडलो. माझी पत्नी आणि मुलं मला विचारत होती की तुम्ही एवढं का रडताय. तेव्हा मी म्हटलं माझ्या मित्रासाठी रडतोय, तो असा मरू शकत नाही. मी त्याला रात्रभर फोन केले आणि मग सकाळची मला समजले की तो आता बरा आहे.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.