ICC Hall Of Fame : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याला सोमवारी ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज मॅथ्यू हेडन आणि दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला यांसह वर्ष 2025 च्या आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सामील करण्यात आलं आहे. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सामील करण्यात येणार धोनी हा भारतीय क्रिकेटमधील 11 वा खेळाडू आहे. एम एस धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 वर्ल्ड कप, 2011 वनडे वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
आयसीसीने धोनीला हा सन्मान देताना म्हटले की, 'दबावाखाली शांत राहून खेळण्याचा अनुभव आणि अतुलनीय रणनीतिक कौशल्यासाठी प्रसिद्ध, तसेच छोट्या फॉरमॅटमध्ये एक अग्रणी खेळाडू म्हणून काम करणारा एमएस धोनीचा आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करून त्याला सन्मानित करत आहोत'. धोनीने म्हटले की, 'आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणं हा सन्मान आहे, जो जगभरातील विविध पिढ्यांमधील क्रिकेटपटूंच्या योगदानाची दखल घेतो'.
आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर, बिशन सिंह बेदी, कपिल देव, अनिल कुंबले, राहुल द्रविड़, सचिन तेंडुलकर, वीनू मांकड, डायना एडुल्जी, वीरेंद्र सहवाग, नीतू डेविड नंतर आता एम एस धोनीचा देखील समावेश झालेला आहे.
"Whenever you played against him, you knew the game was never over until he was out!"
Cricket greats celebrate MS Dhoni, one of the newest inductees in the ICC Hall of Fame
https://t.co/oV8mFaBfze pic.twitter.com/118LvCP71Z
— ICC (ICC) June 10, 2025
एम एस धोनीने टेस्ट क्रिकेटमध्ये 90 सामन्यांमध्ये 4876 धावा केल्या. यात त्याने 6 शतकं आणि 1 द्विशतक ठोकलं. वनडे क्रिकेटमध्ये 350 सामन्यांमध्ये 10773 धावा आणि 10 शतकं ठोकली आहेत. तर 98 टी २० सामन्यांमध्ये 1617 धावा केल्या आहेत. एम एस धोनीने 2020 मध्ये सर्व क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली.