MS Dhoni Start Practice: भारताचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे. दिर्घकाळापासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब असलेल्या महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा मैदानात उतरलाय आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (video viral) होतोय. हा व्हिडिओ पाहून धोनीने आगामी आयपीएल (IPL 2023) हंगामासाठी सरावाला सुरूवात केली असल्याचे बोले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. धोनीच्या नेतृत्वात भारताने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. तर आयपीएलमध्ये धोनीने चेन्नईच्या संघाला चार ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत. अशातच 41 वर्षीय धोनी पुन्हा एकदा सराव करण्यासाठी खेळपट्टीवर उतरला आहे. धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये तो नेट्सवर सराव करताना पाहायला मिळत आहे. 


वाचा : हार्दिक पांड्याला थर्ड अंपायरने दिले चुकीचे आऊट! 


धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द


महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि  98 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्याने 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक झळकावली आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 10 हजार 773 धावांची नोंद आहे. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीनं 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्यानं एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.



 IPL 2023 च्या CSKचा संघ -


महेंद्रसिंग धोनी, बेन स्टोक्स, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, दीपक चहर, अजिंक्य रहाणे, थिक्साना महिषा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, ड्वेन प्रेटोरियस, मुकेश चौधरी, समिरजीत सिंग, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगर्गेकर, प्रशांत सोलंकी, सुभ्रांषू सेनापती, शैक राशीद, निशांत सिंधू, कायले जेमिन्सन, अजय मंडल, भगत वर्मा.