धोनीचा 'अ‍ॅनिमल' लूक पाहून नेटकरी सैराट, संदीप वांगा रेड्डीसोबतची जाहिरात तुफान VIRAL

MS Dhoni in Ranbir Kapoor's Style From His Animal Movie : रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील लूकमध्ये दिसला महेंद्र सिंग धोनी... VIDEO होतोय VIRAL

दिक्षा पाटील | Updated: Mar 18, 2025, 06:15 PM IST
धोनीचा 'अ‍ॅनिमल' लूक पाहून नेटकरी सैराट, संदीप वांगा रेड्डीसोबतची जाहिरात तुफान VIRAL
(Photo Credit : Social Media)

MS Dhoni in Ranbir Kapoor's Style From His Animal Movie : क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी याला चित्रपट पाहायला प्रचंड आवडतं आणि त्याविषयी त्यांच्या चाहत्यांना चांगलंच माहित आहे. आता धोनी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील लूकमध्ये दिसला आहे. खरंतर, धोनीनं 'अ‍ॅनिमल' चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगासोबत एक इलेक्ट्रिकल सायकलची जाहिरात केली आहे. या जाहिरातीत संदीप रेड्डी वांगा हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसला आहे आणि धोनी हा रणबीर कपूरच्या अंदाजात दिसला आहे. धोनीला त्याच्या गॅन्गसोबत ब्लू सूट, लांब केस अशा लूकमध्ये दाखवण्यात आलं आहे. तर पुढच्याच सीनला तो संदीप रेड्डी वांगाला रणबीरच्या स्टाईलमध्ये ‘बहरा नहीं हूं’ हे बोलतो. 

जाहिरातीच्या सुरुवातीला धोनी हा 'अ‍ॅनिमल' या चित्रपटातील सगळ्यांच्या लक्षात राहिलेल्या एन्ट्रीला रिक्रिएट करताना दिसतो. त्यात त्याच्यासोबत बंदूक घेऊन त्याचा बॉइज ग्रुप हा एका सुंदर अशा लग्झरी गाडीतून बाहेर येताना दिसत आहे. खरंतर या स्पुफमध्ये धोनी इलेक्ट्रिक बाइक घेऊन चालताना दिसत आहे. या ट्विस्टसोबत त्यानं त्याचा स्वॅग तसाच ठेवला आहे. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असलेला संदीप रेड्डी वांगा कॅमेऱ्याच्या मागून धोनीचा अभिनय पाहुण त्यांची स्तुती करताना दिसतो. त्यावेळी संदीप पटकन शिटी वाजवत त्याची स्तुती करतो. हे पाहताच धोनी रणबीचा लोकप्रिय ठरलेला डायलॉग 'सुनाई दे रहा है मुझे, बहरा नहीं हूं मैं' हा डायलॉग बोलतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by EMotorad (@e_motorad)

हेही वाचा : 'अनुपमामध्ये थोडा अ‍ॅटिट्यूड आलाय...'; रुपाली गांगुलीचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केली जया बच्चनशी तुलना

पुढच्या सीनमध्ये धोन लांब केसांसोबत रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाती लूकमध्ये इलेक्ट्रिक बाइक चालवताना दिसत आहे. पण अखेरच्या सीनमध्ये धोनीनं नेटकऱ्यांना आश्चर्यचकीत केलं. आता ही जाहिरात पाहिल्यानंतर धोनीचे चाहते त्याचं कौतूक करता असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकांनी म्हटलं की या जाहिरातीतून धोनीनं रणबीरला मागे टाकलं आहे. तर काही नेटकरी हे धोनीला बॉबी देओलचे सीन रिक्रिएट करण्याची विनंती करत आहेत. तर काही लोकं थाला तू जे काही करतोय ते अप्रतिम करतोस असं म्हटलं आहे. काही नेटकऱ्यांनी फक्त तू मैदानात चांगली कामगिरी करत नाहीस तर कॅमेऱ्यासमोर देखील उत्तम कामगिरी करतोयस.