MS Dhoni सीएसके नाही तर आता मुंबई इंडियन्ससाठी खेळणार? Viral Photo मुळे उडाला गोंधळ

MS Dhoni In Mumbai Indians Jersey: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू एमएस धोनीने मुंबई इंडियन्सची जर्सी घातली आहे. एमआय जर्सीमधील धोनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामुळे सीएसकेचे चाहते थक्क झाले आहेत.  

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 8, 2025, 10:18 AM IST
MS Dhoni सीएसके नाही तर आता मुंबई इंडियन्ससाठी खेळणार? Viral Photo मुळे उडाला गोंधळ

MS Dhoni In Mumbai Indians T-Shirt:  चेन्नई सुपर किंग्सचा स्टार कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर धोनीचा एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यात तो मुंबई इंडियन्सच्या जर्सीत दिसत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर सीएसकेच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली असून अनेकांना धक्का बसला आहे.

Add Zee News as a Preferred Source

मुंबई इंडियन्सच्या जर्सीत धोनीचा फोटो व्हायरल

महेंद्रसिंह धोनी हे केवळ भारतीय नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. आयपीएलमध्ये ते सुरुवातीपासून चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आले आहेत आणि सीएसकेच्या यशाचं प्रमुख कारण म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. मात्र आता सोशल मीडियावर पसरलेल्या एका फोटोमध्ये धोनी मुंबई इंडियन्सच्या नावाची जर्सी घातलेले दिसत आहेत. या फोटोनंतर चर्चा सुरू झाली आहे की, माही पुढच्या हंगामात चेन्नईऐवजी मुंबई इंडियन्सकडून खेळणार का?

सीएसके फॅन्स झाले हैराण

धोनी म्हणजेच चेन्नई सुपर किंग्स हा संबंध आयपीएलच्या सुरुवातीपासूनच अटूट राहिला आहे. 2008 पासून धोनी सीएसकेसोबत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे जेव्हा चाहत्यांनी त्यांना प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सच्या जर्सीत पाहिलं, तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया उसळल्या

सोशल मीडियावर या फोटोनंतर सीएसकेच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या, तर काहींनी खरोखरच धोनी मुंबईत जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचे फॅन्स मात्र उत्साहित आहेत. एका चाहत्याने लिहिले, “जर धोनी मुंबईत आले, तर आणखी एक ट्रॉफी निश्चित आहे!”

 

दोन्ही संघांचा समसमान विक्रम

धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने पाच आयपीएल किताब जिंकले आहेत, तर मुंबई इंडियन्सनेही पाच वेळा ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. त्यामुळे या दोन्ही संघांमध्ये कायमच कडवी स्पर्धा राहिली आहे. त्यामुळे धोनीचा “एमआय जर्सी फोटो” पाहून चर्चेला आणखी उधाण आलं आहे.

 

नक्की खरं काय आहे?

सध्या मात्र हे स्पष्ट झालेले नाही की फोटो खरा आहे की एडिटेड. अनेकांचे मत आहे की हा फोटो फॅन-एडिट आहे. तरीही सोशल मीडियावर तो जबरदस्त व्हायरल झाला आहे आणि चाहत्यांमध्ये “धोनी मुंबईत?” या चर्चेने जोर धरला आहे.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More