T20 World Cup Final साठी रेल्वेची खास भेट! क्रिकेट चाहत्यांसाठी धावणार स्पेशल ट्रेन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

T20 World Cup Final IND vs NZ : सेमीफायनलयामध्ये जिंकल्यावर, टीम इंडिया आता अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमध्ये दाखल झाली आहे. गतविजेत्या भारताचा सामना रविवारी (८ मार्च) नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडशी होईल. हा मोठा सामना पाहण्यासाठी हजारो चाहते अहमदाबादमध्ये येण्याची अपेक्षा आहे. याच कारणामुळे सरकारने स्पेशल ट्रेन चालवण्याचा निणर्य घेतला आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Mar 7, 2026, 02:24 PM IST
T20 World Cup Final साठी रेल्वेची खास भेट! क्रिकेट चाहत्यांसाठी धावणार स्पेशल ट्रेन, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Mumbai Ahmedabad Special Trains For India Vs New Zealand T20 World Cup Final 2026 on 8 March

Mumbai Ahmedabad Special Trains For India Vs New Zealand T20 World Cup Final : टी20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनल सामन्याचा उत्साह आता संपूर्ण देशभर पसरू लागला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा शेवटचा महत्त्वपूर्ण सामना 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या मोठ्या सामन्याला हजारो क्रिकेट चाहते उपस्थित राहणार असल्याने प्रवास सुलभ व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ फायनलसाठी अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. गतविजेता असलेल्या भारताचा सामना रविवारी न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्याची प्रचंड उत्सुकता पाहता वेस्टर्न रेल्वेने मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे.

Add Zee News as a Preferred Source

चाहत्यांसाठी स्पेशल ट्रेन कधी, कुठून?

क्रिकेट चाहत्यांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन इंडियन रेल्वेने हा विशेष निर्णय घेतला आहे. वेस्टर्न रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाददरम्यान सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. शनिवार रात्रीपासून ते रविवार सकाळपर्यंत दोन स्पेशल ट्रेन धावतील. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागातील क्रिकेट चाहत्यांना अहमदाबादमध्ये पोहोचून फायनल सामना पाहणे अधिक सोपे होणार आहे.

रेल्वेने सोशल मीडियावर दिली माहिती

वेस्टर्न रेल्वेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत ही माहिती दिली. प्रवाशांची वाढती मागणी आणि चाहत्यांची सोय लक्षात घेऊन विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वेने सांगितले. या अंतर्गत बांद्रा टर्मिनस–अहमदाबाद, अहमदाबाद–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि अहमदाबाद–पुणे या मार्गांवर विशेष भाड्याने चार सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत.

 

मिड-डेच्या वृत्तानुसार वेस्टर्न रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे वापरकर्ता सल्लागार समितीचे सदस्य राजीव सिंघल यांनी या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.

सेमीफायनलमध्ये भारताचा जबरदस्त  विजय

2026 ICC मेंस टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडवर 7 धावांनी रोमांचक विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात संजू सॅमसनने जबरदस्त फलंदाजी करत 42 चेंडूत 89 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे भारताने 253/7 असा मोठा धावसंख्या उभारली. टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात नॉकआउट सामन्यातील हा सर्वात मोठा स्कोर ठरला.

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडनेही जोरदार लढत दिली. जेकब बेथेलने उत्कृष्ट फलंदाजी करत 105 धावा केल्या आणि इंग्लंडला विजयाच्या जवळ आणले. मात्र सामन्याच्या शेवटच्या षटकांत जसप्रीत बुमराहच्या अचूक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा डाव 246/7 धावांवर थांबला आणि भारताने सामना जिंकला.

 

आता रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना रंगणार आहे.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More