पावसाची उसंत मुंबईकरांना दिलासा; 'या' जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

दोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा

Updated: Jun 13, 2021, 09:08 AM IST
पावसाची उसंत मुंबईकरांना दिलासा; 'या' जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा title=

मुंबई: पहिल्याच पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडाली होती. दोन दिवस झालेल्या पावसामुळे मुंबई, ठाण्यासह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. आज पावसानं थोडी उसंत घेतल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मागचं कारण म्हणजे भारतीय हवामान विभागानं मुंबईमध्ये आज अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता.

हवामान विभगाने मुंबईत रेड अलर्ट बदलून ऑरेंज अलर्ट दिला. त्यामुळे आता नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज अतिमुसळधार नाही तर मुसळधार किंवा मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मात्र  रेड अलर्ट कायम असणार आहे. 

दुसरीकडे पश्चिम, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातल्या काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 

मुंबईमध्ये सध्या तरी पावसाच्या हलक्या सरी किंवा उघड झाप सुरू आहे. मुंबईत आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं दिली आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. 

नवी मुंबईध्ये सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. अधूनमधून मध्यम तसंच हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसतोय. रात्री पावसानं विश्राती घेतली होती. त्यानंतर पुन्हा सकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली. हवामान खात्याने मुसळधार पावसाबाबत वर्तवलेला अंदाज रायगड जिल्ह्यात मात्र काहीसा चुकताना दिसतो आहे. 

दक्षिण रायगडमधील महाड पोलादपूर या मोठ्या पावसाच्या विभागासह अलिबाग पेण मुरुड तालुक्यात पावसाने विश्रांती घेतल्याचेच चित्र आहे. मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर रायगड, पालघर, रत्नागिरीला आजही रेड अलर्ट आहे. सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघरमध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.