जपानच्या नाओमीने रचला इतिहास; सेरेनावर मात करत जिंकली अमेरिकन ओपन

ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी पहिली जपानी महिला

Updated: Sep 9, 2018, 07:44 PM IST
जपानच्या नाओमीने रचला इतिहास; सेरेनावर मात करत जिंकली अमेरिकन ओपन

न्यूयॉर्क: अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानच्या २० वर्षीय नाओमी ओसाकाने इतिहासाची नोंद केली आहे. अंतिम फेरीत नाओमीने अमेरिकेची आघाडीची टेनिसपटू सेरेना विल्यम्सचा  ६-२, ६-४ अशा सेट्समध्ये पराभव केला. ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी नाओमी ओसाका ही पहिली महिला जपानी खेळाडू ठरली आहे. 

तत्पूर्वी अंतिम फेरीचा हा सामना बराच वादग्रस्त ठरला. या सामन्यात सेरेना विल्यम्सने पंचांशी वाद घातला. पहिला सेट २-६नं गमावल्यानंतर सेरेनानं चेअर पंच कार्लोस रामोस यांच्याशी वाद घातला. सेरेनाशी सामन्यादरम्यान तिच्या प्रशिक्षकांशी इशाऱ्याद्वारे संवाद साधला. हे नियमांचं उल्लंघन असल्यानं पंच कार्लोस यांनी सेरेनाला इशारा दिला. रॅकेटनं फाऊल केल्याप्रकरणी जेव्हा सेरेनाला दुसऱ्यांदा इशारा दिला. त्यावेळी सेरनेच्या रागाचा पारा चढला. तिने रडत रडत पंचांना चोर म्हटले. या प्रसंगामुळे हा सामना चांगलाच नाट्यमय ठरला.