IND vs AUS 1st ODI Free Live Streaming: भारतीय क्रिकेट संघाचा युवा स्टार शुभमन गिलसाठी येणारे काही दिवस अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहेत. वेस्टइंडिजविरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये संघाचं नेतृत्व केल्यानंतर अवघ्या सहा दिवसांतच गिल आता वनडे फॉरमॅटमध्ये नव्या भूमिकेत दिसणार आहे. शुभमन गिल पहिल्यांदाच भारतीय संघाचं वनडे कर्णधारपद सांभाळणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 19 ऑक्टोबर रोजी पर्थ स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात शुभमन गिल पहिल्यांदाच भारताचा वनडे कर्णधार म्हणून मैदानात टॉससाठी उतरणार आहे. ही मालिका भारताच्या 2027 आयसीसी वनडे विश्वचषकाच्या तयारीचा प्रारंभ म्हणूनही पाहिली जात आहे. हा विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिंबाब्वे आणि नामिबिया येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघ 15 ऑक्टोबरला दिल्लीहून ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे.
या मालिकेतील सर्वात मोठी बातमी म्हणजे विराट कोहलीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होणं. सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारताचा सर्वात मोठा स्टार पुन्हा मैदानात उतरणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली कोहली खेळणार असून, गिलने माजी कर्णधार रोहित शर्मा आणि कोहलीच्या अनुभवाचं कौतुक केलं आहे. गिल म्हणाला, “रोहित आणि कोहलीकडे अनुभवाचं मोठं भांडार आहे. त्यांनी भारताला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. अशा खेळाडूंना संघात ठेवणं टीमसाठी फायदेशीर ठरेल.”
शुभमन गिलसाठी ही मालिका मोठी परीक्षा ठरणार आहे, कारण त्याला संघात दोन माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या उपस्थितीत नेतृत्व करायचं आहे. गिल म्हणाला, “मी रोहित भाईंकडून खूप काही शिकलो आहे. त्यांचा शांत स्वभाव आणि टीममधील वातावरण मैत्रीपूर्ण ठेवण्याची कला, ही गुणं मी नक्की आत्मसात करू इच्छितो.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना फ्रीमध्ये पाहण्यासाठी फॅन्सना जास्त काही करावं लागणार नाही. हा सामना दूरदर्शन (DD National आणि DD Sports) वर फ्रीमध्ये थेट पाहता येईल. तसेच, Star Sports Network आणि JioCinema / Hotstar अॅपवरही प्रेक्षकांना सामना पाहण्याची सुविधा मिळेल.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.