गोल्डन बॉयचा डायमंड थ्रो! 88.16 मीटर भाला फेकून जिंकली Paris Diamond League

Neeraj Chopra Wins Paris Diamond League 2025: शुक्रवारी रात्री स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला. त्याने जर्मनीच्या ज्युलियन वेबरला हरवून दोन वर्षांनंतर पहिले डायमंड लीग विजेतेपद जिंकले.  

तेजश्री गायकवाड | Updated: Jun 21, 2025, 11:35 AM IST
गोल्डन बॉयचा डायमंड थ्रो!  88.16 मीटर भाला फेकून जिंकली Paris Diamond League
Neeraj Chopra won Paris Diamond League 2025

Neeraj Chopra Wins Paris Diamond League With Stunning 88.16m Throw: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. पॅरिस येथे पार पडलेल्या डायमंड लीगमध्ये नीरजने जोरदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, त्याने आपल्या जुन्या प्रतिस्पर्धी जर्मनीच्या जूलियन वेबरला मागे टाकत दोन स्पर्धांतील पराभवाची परतफेडही केली. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.16 मीटरचा जबरदस्त थ्रो करत स्पर्धेची आघाडी घेतली आणि अखेरपर्यंत ती टिकवली. त्यानंतर त्याचा दुसरा थ्रो 85.10 मीटरचा होता. मात्र तिसरा, चौथा आणि पाचवा प्रयत्न फाउल ठरले. शेवटच्या सहाव्या प्रयत्नात नीरजने 82.89 मीटरचा थ्रो नोंदवला.

जूलियन वेबरला मिळाले दुसरे स्थान 

जर्मनीच्या जूलियन वेबरने 87.88 मीटरचा थ्रो करत दुसरे स्थान मिळवले, तर ब्राझीलच्या लुईज मौरिशियो डा सिल्वाने 86.62 मीटरच्या थ्रोने तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत 90 मीटर क्लबमधील 5 दिग्गज भालाफेकपटूंनी भाग घेतला होता. नीरजने याआधी 16 मे रोजी दोहा डायमंड लीगमध्ये 90.23 मीटर थ्रो करत दुसरे स्थान मिळवले होते.

 

'असा' रंगला नीरजचा खेळ 

  • 88.16 मीटर
  • 85.10 मीटर
  • फाउल
  • फाउल
  • फाउल
  • 82.89 मीटर

 

स्पर्धेतील क्रमवारी:

  • नीरज चोप्रा – 88.16 मीटर
  • जूलियन वेबर – 87.88 मीटर
  • लुईज मौरिशियो डा सिल्वा – 86.62 मीटर
  • केशोर्न वाल्कॉट – 81.66 मीटर
  • एंडरसन पीटर्स – 80.29 मीटर
  • जूलियस येगो – 80.26 मीटर
  • एड्रियन मर्डारे – 76.66 मीटर
  • रेमी रूजेटे – 70.37 मीटर

नीरज चोप्राचा हा विजय ऑलिम्पिकपूर्वी भारतीय चाहत्यांसाठी मोठा आनंददायी ठरला आहे.