वेलिंग्टन : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand vs India) यांच्यातील तिसरा टी 20 सामना अखेर टाय झाला आहे. बीसीसीायने (Bcci) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. सामन्यादरम्यान पावसाने तब्बल 2 वेळा व्यत्यय आणला. त्यामुळे सामना काही वेळेसाठी थांबवावा लागला होता. मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार दोन्ही संघाचा स्कोअरही बरोबरीत होता. त्यामुळे सामना अखेर बरोबरीत सुटला. त्यामुळे टीम इंडियाने 1-0 फरकाने मालिका जिंकली आहे. (nz vs ind 3rd t 20i new zealand vs india match tied india win series at mclean park napier)


सामन्याचा धावता आढावा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला 19.4 ओव्हरमध्ये  160 धावांवर ऑलआऊट केलं. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. मोहम्मद सिराजने 17 आणि  अर्शदीपने 37 धावा देत प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. 


विजयी धावांचं पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाने 9 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 75 धावा केल्या. मात्र तेव्हाच पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवावा लागला. पावसामुळे सामना पुन्हा सुरु झाला नाही. डकवर्थ लुईस नियमानुसार टीम इंडियाला 9 ओव्हरमध्ये 76 धावांचं आव्हान मिळालं. मात्र टीम इंडियाच्या 75 धावा असल्याने सामना बरोबरीत सुटला. परिणामी टीम इंडियाने 1-0 ने मालिका जिंकली.  



दरम्यान टी 20 नंतर 25 नोव्हेंबरपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत शिखर धवन टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.


न्यूजीलंड प्लेइंग-XI : टिम साउथी (कर्णधार), फिन एलन, डेवोन कॉनवे (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, डेरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सैंटनर, एडम मिल्ने, ईश सोढी, आणि लॉकी फर्ग्युसन.


टीम इंडिया प्लेइंग-XI : ईशान किशन, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल.