धडाकेबाज फलंदाजांकडून धावांचा डोंगर, ऑस्ट्रेलियासमोर 177 धावांचं आव्हान
बाबर आझमने 34 बॉलमध्ये 39 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 5 चौकार मारले. तर फखर जमानने 32 बॉलमध्ये 55 धावा केल्या.
दुबई: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजांनी एकामेक एक धावा काढत मोठा डोंगर रचला आहे. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमने चांगली सुरुवात केली. दोघांनी मिळून शतकापर्यंतचा डाव सांभाळला. रिझवाननं 52 बॉलमध्ये 3 चौकार आणि 4 षटकांरांच्या मदतीनं 67 धावांची खेळी केली.
बाबर आझमने 34 बॉलमध्ये 39 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 5 चौकार मारले. तर फखर जमानने 32 बॉलमध्ये 55 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 षटकार आणि तीन चौकार ठोकले. ऑस्ट्रेलिया संघासमोर 177 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. तिघांनी मिळून धावांचा डोंगर रचला आहे. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकला आहे. पहिल्यादा या संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. तर पाकिस्तान संघाला फलंदाजी करावी लागली. तिघांनी मिळून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. आता पाकिस्तानच्या गोलंदाजांंना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान आहे.
पाकिस्तान संघ प्लेइंग इलेव्हन
मोहम्मद रिझवान, बाबर आझम, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हरिस रौफ आणि शाहीन आफ्रिदी.
ऑस्ट्रेलिया संघ प्लेइंग इलेव्हन
डेव्हिड वॉर्नर, एरॉन फिंच, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा आणि जोश हेझलवूड.