Pakistan Sohail Khan on Virat Kohli: भारतीय क्रिकेटर विराट कोहलीला (Indian Cricketer Virat Kohli) पाकिस्तानविरोधात (Pakistan) फलंदाजी करणं नेहमीच आवडतं. विराट कोहलीचा रेकॉर्ड तपासून पाहिला तरी हे स्पष्ट होतं. पाकिस्तानविरोधातील सामन्यांमध्ये विराटने काही सर्वात्कृष्ट खेळी खेळल्या आहेत. मात्र पारंपारिक प्रतिस्पर्धी असतानाही विराट मैदानाबाहेर मात्र पाकिस्तानच्या खेळाडूंशी आपलेपणाने वागत असतो. यामुळेच पाकिस्तनातही त्याचे खूप चाहते आहेत. मात्र मैदानात खेळताना विराटच्या आक्रमक स्वभावामुळे काही पाकिस्तानी गोलंदाजांचा मात्र तो नावडता खेळाडू असून त्याला आपला शत्रूच मानतात. यापैकीच एक गोलंदाज म्हणजे पाकिस्तानचा माजी गोलंदाज सोहेल खान (Sohail Khan) आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2015 मधील वर्ल्ड कप (2015 World Cup) सामन्यादरम्यान विराट कोहली आणि सोहेल खान आमने-सामने आले होते. या सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकलं होतं. दुसरीकडे सोहेल खानने पाच विकेट्स मिळवले होते. मैदानात विराट कोहली आणि सोहेल वारंवार आमने-सामने येत असल्याने तणाव निर्माण झाला होता. पण यावेळी त्या दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला होता हे अद्याप उघड झालं नव्हतं. 


मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोहेल खानने मैदानात कोहलीसोबत काय बोलणं झालं होतं याचा खुलासा केला आहे. मात्र हे सांगताना त्याने केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. "विराट माझ्याकडे येऊन म्हणाला की, तू आता क्रिकेटमध्ये आला आहेस आणि इतकं बोलत आहे. तेव्हा मी कसोटी खेळाडू होतो. 2006-07 मध्ये मी कसोटी सामने खेळलो होतो. यादरम्यान गुडघ्याचा त्रास सुरु झाल्याने मी विश्रांती घेतली होती. मी त्याला म्हणालो 'लेका जेव्हा तू अंडर-19 खेळत होतास, तेव्हा तुझा बाप टेस्ट क्रिकेटर होता", असा खुलासा सोहेलने Podcast मध्ये केला आहे. 


पुढे तो म्हणाला की "मी असंत बोललो होतो. तुम्ही नीट पाहिलंत तर, नंतर मिसबाहने मध्यस्थी केली आणि माझ्यावर रागावला. त्याने मला शांत राहण्यास सांगितलं. नंतर धोनी आला आणि त्याने कोहलीला बाजूला हो, हा जुना खेळाडू आहे, तू याला ओळखत नाहीस सांगितलं. यानंतर कोहली गेला आणि एका कोपऱ्यात उभा राहिला". 



या घटनेला आठ वर्षं झाली असून सोहेलने आता मात्र आपल्यासाठी ते प्रकरण इतकं महत्त्वाचं नसल्याचं म्हटलं आहे. तसंच कोहलीसाठी आपल्या मनात आदर असल्याचा उल्लेख केला. "तो एक महान खेळाडू असल्याने मी त्याचा आदर करतो," असं त्याने सांगितलं आहे. 


सोहेलने पाकिस्तानकडून 9 कसोटी , 13 एकदिवसीय आणि पाच टी-20सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे 51 विकेट्स आहेत. गेल्या पाच वर्षांपासून सोहेल क्रिकेटपासून दूर आहे, पण त्याने अद्याप आपली निवृत्ती जाहीर केलेली नाही.