Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे (Champions Trophy 2025) यजमानपद असणारा पाकिस्तानचा संघ ग्रुप स्टेज सामन्यात मिळालेल्या सलग दोन पराभवामुळे स्पर्धेतून थेट बाहेर पडला आहे. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून तर दुसऱ्या सामन्यात भारताकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र यानंतरही पाकिस्तानचा माज काही कमी होताना दिसत नाही. पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटर सकलैन मुश्ताक याने भारताविरुद्ध एक स्टेटमेंट करून लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने भारताला थेट चॅलेंज देत म्हटले आहे की जर भारत खरंच जगातील सर्वोत्कृष्ट संघ असेल तर त्यांनी पाकिस्तान सोबत 10 टेस्ट, 10 वनडे आणि 10 टी-20 सामने खेळावे त मग कळेल की ते सर्वोत्कृष्ट संघ आहेत की नाही.
न्यूज 24 वरती चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याचे समीक्षण करत असताना पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज सकलैन मुश्ताकने सांगितले की, 'जर भारत आणि पाकिस्तान 10 टेस्ट, 10 वनडे आणि 10 टी-20 सामन्यात आमने सामने आले की मग कळेल की भारतीय संघ खरंच जगातला उत्कृष्ट संघ आहे की नाही ते. जर पाकिस्तान चांगली तयारी करतो आणि वेळ प्रसंगी चांगले निर्णय घेते तर आपण भारताला नक्कीच हरवू शकू'. सध्या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटचं हे वक्तव्य खूप चर्चेत आहे.
हेही वाचा : भारताच्या 'या' दिग्गज गोलंदाजाला मिळाली होती बोटं कापण्याची धमकी, देशासाठी घेतल्या आहेत 765 विकेट्स
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमान आणि गतविजेता संघ असलेल्या पाकिस्तानला यंदा स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही. पाकिस्तानचा पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पराभव झालाच होता, मात्र दुसऱ्या सामन्यात भारताकडून पराभव झाल्यावर ते थेट चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडले. तर बांग्लादेश विरुद्ध तिसऱ्या सामन्यात सुद्धा पाऊस पडकल्याने तो सामना अनिर्णित राहीला. या पराभवामुळे पाकिस्तानची क्रिकेट जगतात नामुष्की झाली.
भारताने पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या विरुद्ध लागोपाठ दोन सामने जिंकून ग्रुप ए मधून सेमी फायनलमध्ये जागा मिळवली आहे. याशिवाय ग्रुप ए मधून न्यूझीलंडने देखील सेमी फायनलमध्ये एंट्री मिळवली आहे. तर ग्रुप बी मधून ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका हे संघ सेमी फायनलसाठी क्वालिफाय झालेत. ग्रुप ए मध्ये सध्या भारत अव्वल स्थानी आहे, तर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी आहे. परंतु रविवारी होणाऱ्या सामन्याच्या निर्णयानंतर ग्रुप ए च्या पॉईंट टेबलमध्ये बदल होऊ शकेल. त्यामुळे या सामन्यानंतरच भारत सेमी फायनल ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार की साऊथ आफ्रिके विरुद्ध हे निश्चित होईल.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.