भारत - पाकिस्तान तणावामुळे स्थगित करण्यात आलेली IPL आणि PSL एकाच दिवशी होणार सुरु

IPL 2025 And PSL 2025 : तणावामुळे आयपीएल सह पाकिस्तानात सुरु असणारी पाकिस्तान सुपर लीग ही टी 20 स्पर्धा सुद्धा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती.

पुजा पवार | Updated: May 13, 2025, 05:58 PM IST
भारत - पाकिस्तान तणावामुळे स्थगित करण्यात आलेली IPL आणि PSL एकाच दिवशी होणार सुरु
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 And PSL 2025 : भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा 17 मे पासून पुन्हा एकदा खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने 12 मे रोजी आयपीएलचं नवं वेळापत्रक जाहीर केलं त्यानुसार 6 ठिकाणी 17 सामने खेळवले जाणार आहेत.  तणावामुळे आयपीएल सह पाकिस्तानात सुरु असणारी पाकिस्तान सुपर लीग ही टी २० स्पर्धा सुद्धा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. मात्र आता पीएसएल लीगच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली असून ही स्पर्धा सुद्धा आयपीएल प्रमाणे 17 मे पासून पुन्हा एकदा खेळवली जाणार आहे. 

आयपीएलचा फायनल सामना कधी? 

7 मे रोजी धर्मशाला स्टेडियमवर सुरु असलेल्या पंजाब विरुद्ध दिल्ली सामना भारत - पाक तणावस्थितीमुळे थांबवण्यात आला होता. त्यानंतर बीसीसीआयने एक आठवड्यासाठी स्पर्धा स्थगित केली. सध्या आयपीएलचे 17 सामने शिल्लक आहेत. यांचं वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलं असून त्यानुसार 17 मे रोजी स्पर्धेला पुन्हा सुरुवात होऊन 3 जून रोजी फायनल सामना पार पडेल. 

पीएसएलचा फायनल सामना कधी? 

भारतीय लष्कराने पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला प्रतिउत्तर देत असताना रावळपिंडीजवळ ड्रोन हल्ला केला. यात रावळपिंडी स्टेडियमचा काही भाग उध्वस्त झाला. त्याचज दिवशी संध्याकाळी येथे पीएसएलचा सामना खेळवला जाणार होता. मात्र तणावपूर्ण स्थितीमुळे सामना रद्द करण्यात आला. आयपीएलनंतर पीएसएलने सुद्धा नव्या वेळापत्रकाची घोषणा केली असून यानुसार त्यांचा पहिला सामना हा 17 मे रोजी खेळवला जाईल. तर फायनल सामना हा 25 मे रोजी पार पडेल. 

हेही वाचा 'तू खुश आहेस का?' निवृत्तीनंतर विराटला प्रेमानंद महाराजांनी विचारला प्रश्न, पाहा काय म्हणाला कोहली?

 

प्लेऑफचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

क्वालिफायर 1 – 29 मे
एलिमिनेटर – 30 मे
क्वालिफायर 2 – 1 जून
अंतिम सामना – 3 जून

इथे होऊ शकतो फायनल सामना : 

मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत असलेल्या माहितीनुसार आयपीएल 2025 चा फायनल सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शिफ्ट केला जाऊ शकतो. त्यामुळे लाखो प्रेक्षकांना याची देही याची डोळा फायनल सामना पाहण्याची संधी मिळू शकेल. IPL 2025 चा क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामना हा हैदराबादमध्ये खेळवला जाणार होता तर क्वालिफायर 2 कोलकातामध्ये होणार होती. परंतु रिपोर्ट्सनुसार क्वालिफायरचे दोन्ही सामने हे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवले जाऊ शकतात.