पाकिस्तानच्या मुलांना वाचव रे देवा! PSL पाहत शिक्षिका तपासत होती पेपर, VIDEO व्हायरल

PSL 2025 : पाकिस्तान क्रिकेट लीग दरम्यान एक शिक्षिका स्टेडियममध्ये सामन्याचा आनंद घेत असतानाच मुलांचे पेपर सुद्धा तपासताना दिसली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 

पुजा पवार | Updated: Apr 23, 2025, 05:29 PM IST
पाकिस्तानच्या मुलांना वाचव रे देवा! PSL पाहत शिक्षिका तपासत होती पेपर, VIDEO व्हायरल
(Photo Credit : Social Media)

PSL 2025 : भारतात सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग प्रमाणेच पाकिस्तानात सुद्धा पाकिस्तान सुपर लीग सुरु आहे. क्रिकेट या खेळाची क्रेज जगात केवढी आहे याचे उदाहरण पुन्हा एकदा या स्पर्धेत पाहायला मिळाले. पाकिस्तान क्रिकेट लीग दरम्यान एक शिक्षिका स्टेडियममध्ये सामन्याचा आनंद घेत असतानाच मुलांचे पेपर सुद्धा तपासताना दिसली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 

बीसीसीआय प्रमाणेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टी 20 लीग सुरु केली आहे. भारतात आयपीएल सुरु असतानाच पाकिस्तान सुपर लीगचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. बऱ्याचदा पाकिस्तानचे माजी क्रिकेटर्स स्वतःच टीव्ही चॅनलवरून त्यांच्या देशातील क्रिकेट लीगबाबत मजेशीर टिपण्णी करताना दिसतात. पाकिस्तान सुपर लीगच्या एका सामन्यादरम्यान शाळेतील शिक्षिका स्टेडियममध्ये पेपर चेक करताना दिसली. टी 20 क्रिकेट सामना सुरु असताना शिक्षिका शाळेतील मुलांचे पेपर तपासात होती. जेव्हा तिच्या बाजूला असलेल्या लहान मुलाने तिला तुम्ही कॅमेरामध्ये दिसताय असं सांगितलं तेव्हा शिक्षिकेने लगेचच पेपर तपासणी बंद केली. स्टेडियममध्ये पेपर तपासणाऱ्या शिक्षिकेच्या विद्यार्थ्यांना कसे मार्क मिळतील याबाबत नेटकरी व्हिडीओ खाली कमेंट करत आहेत. 

पाहा व्हिडीओ : 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

21 एप्रिल रोजी सोमवारी पाकिस्तान प्रीमियर लीगमध्ये कराची किंग्स विरुद्ध पेशावर जाल्मी यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. कर्णधार आणि ओपनर बाबर आझमने 41 बॉलमध्ये 46 धावा केल्या. बाबरच्या दमदार खेळीच्या सहाय्याने संघाने 8  विकेट गमावून 147 धावांचा स्कोअर उभा केला. विजयाचं आव्हान पूर्ण करण्यासाठी उतरलेल्या कराची किंग्सने 19.3 ओव्हरमध्येच 2 विकेट राखून सामना जिंकला. यात कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 47 बॉलवर 8 चौकार ठोकून तब्बल 60 धावा केल्या. 

पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये आयपीएल सामना : 

काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये पाकिस्तान सुपर लीगचा सामना सुरु असताना स्टेडियममध्ये एक फॅन मोबाईलवर आयपीएलचा सामना पाहत होता. यावेळी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरु होता. समोर मैदानात पाकिस्तान सुपर लीगचा सामना सुरु असताना फॅन मात्र मोबाईलवर आयपीएल सामना पाहण्यात गुंग असल्याचे दिसले.