Pakistan Awkward English Interview Video Viral: पाकिस्तान क्रिकेट संघाने हाँगकाँग सिक्सेस 2025 (Hong Kong Sixes Champions 2025) स्पर्धेचं जेतेपद पटकावलं असलं, तरी विजेतेपद मिळवल्यानंतर जे घडलं त्याने सोशल मीडियावर चर्चेचा भडीमार सुरू झाला आहे. सामना जिंकूनही पाकिस्तान संघाची पार इज्जत गेली, आणि त्यांचे इंग्रजी बोलण्याचे व्हिडीओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहेत.
रविवारी खेळल्या गेलेल्या फायनल सामन्यात पाकिस्तानने कुवैतचा पराभव करून ट्रॉफी जिंकली, पण पोस्ट-मॅच प्रेझेंटेशनदरम्यान अशी घटना घडली की सोशल मीडियावर सगळीकडे फक्त पाकिस्तान संघाचीच खिल्ली उडवली जात आहे. प्रेझेंटेशनदरम्यान खेळाडूंना इंग्रजीत प्रश्न विचारण्यात आले, पण त्यांची उत्तरे ऐकून मुलाखत घेणारी अँकरही हसणं थांबवू शकली नाही. इतकंच नाही, तर पीसीबीचे मीडिया जनरल मॅनेजर, जे त्या वेळी टीमसोबत अनुवादकाच्या भूमिकेत होते, त्यांचं इंग्रजी ऐकून चाहत्यांना विश्वासच बसत नव्हता.
त्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचे काही खेळाडू इंग्रजी बोलताना अडखळताना दिसतात, आणि सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्या क्लिप्सना मीम्समध्ये रूपांतरित केलं आहे.
Trust me he is the GM Media of PCB, currently serving as the team’s translator at the Hong Kong tournament. Ironically, his original posting was in the PCB archives department. I still remember once he accompanied a top Pakistan cricketer to a presentation ceremony. When they… pic.twitter.com/BzYpZ1fwoS
— Sanaullah Khan (@Sanaullahpaktv) November 9, 2025
या 6 ओव्हर्सच्या टुर्नामेंटच्या फायनलमध्ये पाकिस्तानने आधी फलंदाजी करत 135 धावांचा मोठा डोंगर उभा केला. कर्णधार अब्बास अफरीदीने फक्त 11 चेंडूत 52 धावा ठोकल्या, ज्यात 2 चौकार आणि तब्बल 7 षटकारांचा समावेश होता. त्याला साथ दिली अब्दुल समदने, ज्याने 13 चेंडूत 42 धावांची खेळी केली आणि 5 षटकार झळकावले. तर ख्वाजा नफय ने फक्त 6 चेंडूत 22 धावा केल्या. कुवैतकडून मीत भावसारने सर्वाधिक 3 बळी घेतले, पण पाकिस्तानचा रनफ्लो थांबवू शकला नाही.
लक्ष्याचा पाठलाग करताना कुवैतची सुरुवात छान झाली होती. अदनान इदरीस आणि मीत भावसार यांनी पहिल्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. इदरीसने 8 चेंडूत 30 धावा करत 5 षटकार ठोकले, तर भावसारने 12 चेंडूत 33 धावा करत 3 चौकार आणि 3 षटकार मारले. पण दोघे बाद झाल्यानंतर संपूर्ण संघ कोसळला आणि कुवैत 92 धावांवर सर्वबाद झाला.
सामना संपल्यानंतर जेव्हा ट्रॉफी सेरेमनी झाली, तेव्हा खेळाडूंच्या इंग्रजी बोलण्याच्या क्लिप्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या. नेटकरी म्हणत आहेत की “ट्रॉफी जिंकली खरी, पण इंग्रजीने विकेट घेतली!”
iss translator ke liye bhi ek translator lao
— LuckyladSol (@luckylad_Sol) November 9, 2025
Translator ko hie English nahi aati
— Share Market Waale (@ShareMarket008) November 9, 2025
आता या घटनेमुळे पाकिस्तानचा संघ आणि पीसीबी दोघेही ट्रोल्सच्या निशाण्यावर आहेत.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.