Preity Zinta Shares Then And Now Pic With Yuzvendra Chahal : पंजाब किंग्सनं IPL 2025 मध्ये आपल्या खेळाने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आहे. त्यामुळे प्रीती झिंटा आपल्या संघाच्या कामगिरीवर खूपच आनंदी आहे. विशेषतः युझवेंद्र चहलमुळे ती खूप आनंदी आहे. त्याचं कारण म्हणजे, पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सकडून ते जिंकत असलेला सामना हा जणू काही हिसकावून घेतला आहे. त्या विजयाचं कारण हा युझवेंद्र चहल आहे त्यानं यात खूप मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे प्रीती झिटांनं सोशल मीडियावर युझवेंद्र चहलचं कौतुक करत एक भावनिक आणि मोठी पोस्ट शेअर केली आहे.
गुरुवारी प्रीतिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चहलसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये प्रीतिनं अंडर-19 टीमसोबत पोज देताना दिसत आहे. ज्या टीममध्ये चहल देखील दिसला होता. तर पुढच्या फोटोमध्ये चहलला मिठी मारताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये दोघं कॅमेऱ्याकडे पाहत हाताता ट्रॉफी घेऊन पोज देताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत प्रीतिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की 'हे सगळं कसं सुरु झालं आणि आता कुठ पर्यंत पोहोचलं आहे. मी चंडीगढमध्ये 2008/09 मध्ये किंग्स कप दरम्यान, चहलला भेटली होती. मी क्रिकेटमध्ये नवीनचं होते आणि तो अंडर-19 क्रिकेटर होता. या गोष्टीला 16 वर्ष झाली आहेत आणि या 16 वर्षांमध्ये मी त्याला क्रिकेटच्या जगात स्वत: चं स्थान मिळवत आणि नाव कमावताना पाहिलं.'
पुढे प्रीतिनं म्हटलं, 'त्यानं माझ्या टीममध्ये कायम स्वरूपी रहावं ही माझी इच्छा आहे, पण असं झालं नाही... आता पर्यंत! आमचा अखेरचा खेळ या सगळ्याचं खूप चांगलं उदाहरण आहे की मी इतक्या वर्षांपासून चहलची स्तुती का करायचे. युझवेंद्र तुला माझ्या टीममध्ये घेऊन मी खूप आनंदी आहे. मला कायमच तुला हसत आणि असाच यशस्वी होताना पाहायचं आहे.'
प्रीति झिंटानं शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'याचा अर्थ युझवेंद्र हा नेहमीच पंजाब किंग्सच्या रडावर होता.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'युझवेंद्रचं कमबॅक झालं आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'युझवेंद्र भाऊ तू काय कमाल केलीस.'