'तुम्हाला काय आवडतं...' पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिका रावलला स्वतः वाढलं जेवण! हृदयस्पर्शी Viral Video एकदा बघाच!

PM Offered Food to The Injured Pratika Rawal: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय संघाने बुधवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. टीम इंडियाची सलामीवीर प्रतीका रावल दुखापतग्रस्त असल्याने व्हीलचेअरवरून सहभागी झाली यावेळी पंतप्रधानांनी तिची खास विचारपूस आणि काळजी घेतली.   

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 6, 2025, 01:14 PM IST
'तुम्हाला काय आवडतं...' पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिका रावलला स्वतः वाढलं जेवण! हृदयस्पर्शी Viral Video एकदा बघाच!
PM Narendra Modi Heartwarming Gesture Serves Food To Injured Pratika Rawal

PM Narendra Modi met Indian Women's Team: महिला वनडे विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाचा सत्कार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आपल्या लोककल्याण मार्ग येथील अधिकृत निवासस्थानी खास कार्यक्रम आयोजित केला. हर्मनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील खेळलेला संपूर्ण संघ, मुख्य प्रशिक्षक अमोल मजूमदार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मनहास यांची यावेळी उपस्थिती होती. क्रिकेट, संघाची मेहनत, विविध अनुभव, श्रद्धा, टॅटू आणि स्किन केअर अशा अनेक विषयांवर हलक्या-फुलक्या गप्पांमधून वातावरण अतिशय आनंदी झाले.

Add Zee News as a Preferred Source

प्रतीका रावलसोबत खास संवाद 

या कार्यक्रमातील सर्वात लक्षवेधी क्षण ठरला तो जखमी प्रतीका रावलसोबत झालेला संवाद. बांगलादेशविरुद्धच्या लीग सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर प्रतीका रावलला पुढील फेरीत खेळता आले नव्हते. सत्कार कार्यक्रमाला ती व्हीलचेअरवर आणि पायाला ‘मून बूट’ लावून उपस्थित होती. कार्यक्रमात सर्वजण जेवणाचा आनंद घेत असताना मोदींचे लक्ष प्रतीकाकडे गेले. ती बाजूला बसलेली असून कोणी तिला काही सर्व्ह करत नसल्याचे पाहताच पंतप्रधान थेट तिच्याजवळ गेले.

हे ही वाचा: विश्वविजेत्या भारतीय महिला संघाला मिळणार हिऱ्याचे दागिने अन् घरांसाठी सोलर पॅनल, कोण करणार या बक्षिकांची बरसात?

 

स्वतः वाढले जेवण 

मोदींनी अत्यंत साधेपणाने आणि काळजीपूर्वक विचारले, "Aapko koi kuch de nahi raha, kya pasand hai aapko?" (तुम्हाला कोणी काही देत नाहीये, तुम्हाला काय आवडतं?) असं बोलत स्वतः तिच्या प्लेटमध्ये पदार्थ वाढला. हा छोटासा पण मनाला भिडणारा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर पटकन व्हायरल झाला आहे. देशभरातून या कृतीचे कौतुक होत आहे. अनेकांनी हा क्षण नेहमीच्या राजकीय चौकटीबाहेर जाऊन ‘माणूस म्हणून मोदींचा स्वभाव’ दर्शवणारा असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा: विश्वविजेती वडिलांसमोर झाली लहान! मुलीने पाया पडताच हरमनप्रीतच्या बाबांनी घेतलं उचलून, भावनिक VIDEO व्हायरल

 

मोदींकडून संघाच्या कामगिरीचे मोठे कौतुक

कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी संघाच्या कामगिरीचे मोठे कौतुक केले. ते म्हणाले, “2017 मध्ये तुम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहोचूनही ट्रॉफीपासून थोडी अंतरावर राहिलात, तेव्हा मी तुम्हाला भेटलो होतो. आज तुम्ही ताज घेऊन परत आलात. ही फक्त तुमचीच नाही, भारताच्या प्रत्येक मुलीची, प्रत्येक कुटुंबाची आणि देशाच्या भावनेची मोठी जिंक आहे.” ते पुढे म्हणाले, “भारतामध्ये क्रिकेट हा फक्त खेळ नाही. काही चांगले झाल्यावर संपूर्ण देश आनंद करतो आणि काही चुकले तर सर्वांवर त्याचा परिणाम होतो. तुम्ही भारताचं नाव जगात अभिमानाने उंचावलंत.”

या भेटीत खेळाडूंनी मोदींशी मुक्तपणे संवाद साधला. हर्मनप्रीत कौरने संघातील ऐक्याबद्दल सांगितले, स्मृती मंधानाने टूर्नामेंट दरम्यानच्या मानसिक तयारीबद्दल अनुभव शेअर केले, तर रेणुका ठाकूर, दीप्ती शर्मा यांच्यासह इतर खेळाडूंनीही मैदानातील खास क्षणांबद्दल बोललं.

हे ही वाचा: "WC सुरु असताना मला खोलीत बोलावून कानाखाली मारली...", 'या' संघाच्या कर्णधारावर गंभीर आरोप, बोर्डाने दिलं स्पष्टीकरण

 

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व खेळाडूंनी मिळून मोदींसोबत जेवणाचा आनंद घेतला. हसतखेळत झालेला हा सन्मान सोहळा संघासाठी प्रेरणादायी ठरल्याचे मानले जात आहे.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More