Team India Champions Trophy 2025 : दुबईमध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं अतिशय अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संघानं आणखी एका बड्या स्पर्धेतं जेतेपद मिळवलं आणि कर्णधार म्हणून रोहितच्या शिरपेचात मानाता आणखी एक तुरा खोवला गेला. तिसऱ्यांदा भारतीय संघानं या स्पर्धेचं जेतेपद मिळवल्यानंतर क्रिकेटप्रेमींचा उत्साहसुद्धा शिखरावर पोहोचला.
इथं संघ टप्प्याटप्प्यानं एकामागून एक स्पर्धांमध्ये विजेता ठरत असतानाच तिथं येत्या दिवसांमध्ये Team India चं लक्ष्य नेमकं काय असणार आहे, हाच प्रश्न अनेक क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करताना दिसत आहे. आवडीच्या खेळाडूंचा खेळ पाण्यासाठी क्रिकेटप्रेमी कितीही उत्सुक असले तरीही एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे टीम इंडिया सुट्टीवर जात असल्याची.
मे महिन्याची सुट्टी ही संकल्पना सहसा शालेय जीवनानंतर नाहीशी होते. पण, क्रिकेटपटू मात्र इथं यंदा अपवाद ठरणार आहेत. कारण त्यांना पुढील तीन महिने कोणतीही क्रिकेच मालिका खेळायची नाहीय. अधिकृतरित्या भारतीय संघ सुट्टीवर असला तरीही ही सुट्टी फक्त नावापुरताच सीमित राहणार असून, क्रिकेटचा महाकुंभ अशी ओळख असणाऱ्या IPL च्या नव्या पर्वासाठी संघातील खेळाडू तयारी करताना दिसतील. 22 मार्च ते 25 मे अशा दोन महिन्यांच्या कालावधीत IPL सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.
यंदाच्या वर्षी या स्पर्धेसाठी 10 संघ सहभागी होत असून, 65 दिवसांमध्ये हे संघ विविध 74 सामन्यांमध्ये आमनेसामने आल्याचं पाहायला मिळेल. भारतातच 13 ठिकाणी या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळं सुट्टी असूनही नसल्यासारखीच असेल असं म्हणणं गैर नाही.
चॅम्पिन्स ट्रॉफीनंतर अधिकृतरित्या भारतीय क्रिकेट संघ पुढील 3 महिन्यांनंतर मैदानात उतरेल. जून-जुलै 2025 दरम्यान संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून इथं दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. या मालिकेची सुरुवात 20 जूनपासून होणार आहे.
20 ते 24 जून- पहिला कसोटी सामना- हेडिंग्ले
2 ते 6 जुलै- दुसरा कसोटी सामना- बर्मिंघम
10 ते 14 जुलै - तिसरा कसोटी सामना- लॉर्ड्स
23 ते 27 जुलै- चौथा कसोटी सामना - मँचेस्टर
31 जुलै ते 4 ऑगस्ट- पाचवा कसोटी सामना - द ओवल
तेव्हा आता क्रिकेटप्रेमी आणि संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाची भेट, 'ब्रेक के बाद'!!!
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
SL
(20 ov) 163/6
|
VS |
IRE
143(19.5 ov)
|
| Sri Lanka beat Ireland by 20 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(20 ov) 184/7
|
VS |
NEP
180/6(20 ov)
|
| England beat Nepal by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AFG
(20 ov) 182/6
|
VS |
NZ
183/5(17.5 ov)
|
| New Zealand beat Afghanistan by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.