)
Pratika Rawal Medal ICC Rules: आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत कर पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. या ऐतिहासिक यशात प्रतिका रावलचा वाटा मोठा होता, पण तिला विजयी टीमला दिलेल्या पदकापासून वंचित राहावे लागले. स्मृति मंधनानंतर दुसऱ्या क्रमांकावर धावांवर अव्वल असूनही प्रतिकाला मेडल न मिळणे ही घटना क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरली. काय आहे नेमकं यामागचं कारण काय? जाणून घेऊया.
प्रतिका रावलने स्पर्धेत सरासरी 51.33 ने एकूण 308 धावा केल्या, ज्यामुळे ती मंधनाच्या 434 धावांनंतर भारतीय संघाची दुसरी आणि एकूण चौथी सर्वोत्तम बॅट्समन ठरली. लीग फेरीत न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत तिने 122 धावांची जबरदस्त खेळी साधली. मंधानासोबत 212 धावांची भागीदारी करून तिने संघाला उपांत्य फेरीत नेले. ही खेळी केवळ आकडेवारी नव्हे, तर संघाच्या आत्मविश्वासाचा आधारस्तंभ ठरली. तिच्या आक्रमक शैलीने बॉलर्सवर कायम दबाव राहिला.
I couldn’t fight on the field, but my heart never left the game every cheer, every tear was mine too @BCCIWomen #IndianCricket
— Pratika Rawal (@PratikaRawal64) November 2, 2025
#SAvIND pic.twitter.com/o3zORzhhhi
लीग फेरीतील शेवटच्या बांगलादेशविरुद्धच्या पावसाने बाधित सामन्यात प्रतिका गंभीर जखम झाली. या दुखापतीमुळे ती उपांत्य आणि अंतिम फेरीत खेळू शकली नाही. हे तिचे केवळ वैयक्तिक नुकसान नव्हते, तर टीमसाठीदेखील मोठा धक्का होता. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला विश्रांती घ्यावी लागली, ज्यामुळे तिच्या विश्वचषकातील प्रवास अर्धवट राहिला. तरीही, तिचे पूर्वीचे प्रदर्शन टीमला प्रेरणा देणारे ठरले.
नवी मुंबईच्या स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी धुळी लावली. जखमी अवस्थेत असूनही प्रतिका व्हीलचेअरवर मैदानावर हजर झाली. खांद्यावर तिरंगा घेऊन, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सहकाऱ्यांसोबत भांगडा नाचत तिने विजयाचा आनंद साजरा केला. मंधानाने तिची व्हीलचेअर मंचापर्यंत नेली. आणि संपूर्ण टीमने एकत्रितपणे उत्सव साजरा केला. पदक मिळाले नसले तरी हा क्षण तिच्या निष्ठेचे प्रतीक ठरला.
प्रतिकाला मेडल का मिळाले नाही? याब्दल आयसीसीचा कठोर नियम जाणन घेऊया. विजयी टीमचे मेडल फक्त अंतिम लढतीसाठी निवडलेल्या 15 खेळाडूंसाठी राखीव असतात. जखमी असल्याने प्रतिका या यादीत समाविष्ट झाली नाही. हा नियम वास्तववादी वाटत असला तरी तिच्या संपूर्ण स्पर्धेतील योगदानाकडे दुर्लक्ष करणारादेखील वाटतो. जेमिमा रोड्रिग्स आणि राधा यादवसारख्या सहकाऱ्यांनी आपले पदक तिच्या गळ्यात घालून या त्रुटीची भरपाई करण्याचा प्रयत्न केला. यातून मुलींचे टीम बॉंडींग दिसून आले.
Kehte hai hamko pyar se India vale pic.twitter.com/Vcz7naKgev
— Pratika Rawal (@PratikaRawal64) November 4, 2025
'हा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाहीत. खांद्यावर तिरंगा असणे ही मोठी गोष्ट आहे आहे. तसेच टीमसोबत असणे हा सर्वोत्तम अनुभव असल्याचे प्रतिका म्हणाली.'बाहेर बसून सामना पाहणे कठीण होते. स्टेडियममधील प्रेक्षकांचा उत्साह पाहून अंगावर काटा उभा राहतो. ते या विजयाचे खरे हक्कदार आहेत, असेही ती पुढे म्हमाले.
प्रतिकाने स्पर्धेत ६ सामन्यात ५१.३३ सरासरीने ३०८ धावा केल्या. ती स्मृति मंधनानंतर (४३४ धावा) भारतीय संघाची दुसरी आणि एकूण चौथी सर्वोच्च धावगतीर बॅट्समन ठरली.
जखमी अवस्थेत असूनही प्रतिका व्हीलचेअरवर मैदानावर हजर झाली. तिने कंध्यावर तिरंगा लावून, संघासोबत भांगडा नाचत आणि स्मृतिसोबत मंचापर्यंत जाऊन विजयाचा उत्सव साजरा केला.