Prithvi Shaw MCA : भारताच्या अंडर 19 संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज पृथ्वी शॉ याला मागील अनेक वर्षांपासून टीम इंडियात संधी मिळालेली नाही. भारतीय संघासाठी त्याने शेवटचा सामना 25 जुलै 2021 रोजी खेळला होता. मात्र 25 वर्षांच्या या क्रिकेटरचं देशांतर्गत क्रिकेटमधील करिअर सुद्धा फार चांगलं सुरु नाहीये. त्याच्या फिटनेसवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. असं असतानाच पृथ्वी शॉ देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहे. देशांतर्गत क्रिकेटचं पुढील सत्र सुरु होण्यापूर्वी पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेट असोसिएशनला पात्र लिहून न हरकत पत्र देण्याची विनंती केली आहे.
क्रिकेटर पृथ्वी शॉला एका राज्याच्या क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेट खेळण्याची ऑफर मिळाली आहे. पृथ्वी शॉने एमसीएला पात्र लिहीत म्हटले की, 'करिअरच्या या टप्प्यावर मला एका दुसऱ्या राज्याच्या क्रिकेट असोसिएशनकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची ऑफर मिळाली आहे. मला विश्वास आहे की यामुळे मला क्रिकेटपटू म्हणून आणखी विकास आणि प्रगती करता येईल. हे लक्षात घेता, मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की मला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) द्यावे जेणेकरून मी येत्या स्थानिक हंगामात नवीन राज्य संघटनेचे अधिकृतपणे प्रतिनिधित्व करू शकेन'.
पृथ्वी शॉला मागच्यावर्षी फिटनेसच्या कारणामुळे रणजी ट्रॉफी सामन्यासाठी मुंबई संघातून बाहेर काढण्यात आलं होतं. टीम मॅनेजमेंटने मुंबई क्रिकेट असोसिएशनला सूचित केलं होतं की, पृथ्वी शॉचं वजन खूप जास्त आहे आणि त्याच्या शरीरात 35 टक्के चरबी आहे. त्यानं फिटनेस प्राप्त करण्यासाठी खूप ट्रेनिंग करावी असा सल्लाही देण्यात आला होता. परंतु तरीही त्याच्या फिटनेसमध्ये सुधारणा झाली नाही, ज्यामुळे मुंबई संघाचा निवडकर्त्यांनी त्याला विजय हजारे ट्रॉफी 2024 साठी सुद्धा मुंबई संघात स्थान दिलं नाही.
पृथ्वी शॉने भारतासाठी 5 टेस्ट, 6 वनडे आणि 1 टी 20 सामना खेळला आहे. टेस्ट सामन्यात त्याने 42.37 च्या ऍव्हरेजने 339 धावा केल्या आहेत. ज्यात 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 31.50 सरासरीने 189 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉने त्याचा शेवटचा लिस्ट ए सामना वर्ष 2022 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळला होता. त्याने इंग्लिश काउंटी टीम नॉर्थेम्पटनशायरसाठी वनडे सामने खेळले होते त्यात 5 इनिंगमध्ये त्याने 97, 72, 9, 23 आणि 17 धावा केल्या होत्या.
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
AUS
(70.3 ov) 225 (37 ov) 121
|
VS |
WI
143(52.1 ov) 27(14.3 ov)
|
Australia beat West Indies by 176 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.