R Ashwin on Rohit Virat: रोहित शर्मा आणि विराट कोहलीने अचानक निवृत्ती घेतली असल्याने इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेआधी भारतीय संघात नेतृत्वासंदर्भातील मोठी पोकळी निर्माण झाल्याचं भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज आर अश्विनने म्हटलं आहे. रोहित शर्माने अचानक निवृत्ती जाहीर करत सर्वांना धक्का दिला असताना लागोपाठ विराट कोहलीने कसोटीमधील प्रवास थांबवत असल्याची घोषणा केली. यामुळे बीसीसीआयला आता भारतीय संघाचं नेतृत्व करु शकेल असा खेळाडू शोधावा लागणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने संघाचं नेतृत्व केलं होतं. रिपोर्टनुसार, शुभमन गिलकडे संघाचं नेतृत्व सोपवलं जाण्याची शक्यता आहे. मात्र बुमराह यासाठी जास्त पात्र असल्याचं आर अश्विनचं मत आहे. पण हा निर्णय सर्वस्वी निवडकर्त्यांचा असेल असंही तो म्हणाला आहे.
"दोघेही (रोहित शर्मा आणि विराट कोहली) एकत्र निवृत्ती घेतली याची मला कल्पना नव्हती," असं आर अश्विनने त्याचा युट्यूब शो 'Ash Ki Baat' मध्ये म्हटलं आहे. पुढे तो म्हणाला की, "भारतीय क्रिकेटसाठी हा परीक्षेचा काळ आहे. मी म्हणेन की, आता खऱ्या अर्थाने गौतम गंभीर युग सुरु होत आहे".
"इंग्लंड दौऱ्यावर जाणारा संघ पूर्णपणे नवीन असेल, एक बदललेला संघ असेल जिथे बुमराह कदाचित सर्वात वरिष्ठ खेळाडू असेल. तो अर्थातच कर्णधारपदाच्या पर्यायांपैकी एक आहे. मला वाटतं की तो कर्णधारपदासाठी पात्र आहे, परंतु निवडकर्ते त्याच्या शारीरिक क्षमतेनुसार निर्णय घेतील," असं अश्विन म्हणाला आहे
रोहित आणि विराटच्या निवृत्तीच्या निर्णयावर अश्विन म्हणाला की,या दोघांमध्ये अजूनही भारतीय क्रिकेटला देण्यासाठी भरपूर आहे. भारत 20 जूनपासून इंग्लंडविरोधात पाच कसोटी सामने खेळण्यासाठी उतरेल तेव्हा संघाला विराटची ऊर्जा आणि रोहितचा संयम जाणवेल असंही त्याने म्हटलं आहे.
"त्यांच्या निवृत्तीमुळे नक्कीच नेतृत्वाची पोकळी निर्माण होईल. तुम्ही अनुभव विकत घेऊ शकत नाही. खासकरुन अशा दौऱ्यांमध्ये तो महत्त्वाचा असतो. विराटची एनर्जी आणि रोहितचा संयम यांची कमतरता जाणवेल," असं आर अश्विन म्हणाला.
"कसोटी भारतासाठी गेल्या 10 ते 12 वर्षातील सर्वात उत्तम फॉरमॅट ठरला आहे. पण फक्त नेतृत्वासाठी रोहितने इंग्लंड मालिका संपेपर्यंत थांबायला हवं होतं. जर त्याने चांगली कामगिरी केली असती तर तो खेळत राहिला असता आणि नेतृत्व केलं असतं," असंही तो म्हणाला.
VAN-W
|
VS |
SAM-W
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Vanuatu Women by 35 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.