)
Rahul dravid on wheelchair: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि आताच प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या पायाच्या दुखापतीने त्रस्त आहे. पण एवढी दुखापत असूनही द्रविडच्या कर्तव्यावर कोणताही परिणाम झाला नाही. राजस्थान रॉयल्सचा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सामना रविवारी गुवाहाटी येथे खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक द्रविड व्हील चेअरवर दिसला आणि त्यांनी आपल्या कर्तुत्वाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राहुल द्रविडने व्हील चेअरवरून खेळपट्टीची पाहणी केली. यानंतर एमएस धोनीनेही त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती घेतली.
आयपीएल (IPL 2025) पूर्वी बंगळुरूमध्ये क्रिकेट खेळताना द्रविडला दुखापत झाली होती. त्यानंतर सराव सत्रादरम्यान तो क्रॅच घेऊन चालताना दिसला. आता तो व्हील चेअरवर बसून आयपीएल 2025 मध्ये त्याच्या संघासाठी संपूर्ण कर्तव्य बजावताना दिसत आहे. 22 यार्डची पट्टी व्हील चेअरवरूनच दिसली आणि कॉमेंट्री करणारेही त्याबद्दल चर्चा करताना दिसले. संजय बांगरनेही त्याच्या जिवलग मित्राबद्दल बोलला.
राजस्थानच्या विजयानंतर धोनी त्याच्या दुखापतीची विचारपूस करण्यासाठी आला तेव्हा द्रविड प्रकाशझोतात आला. द्रविड क्रॅचच्या मदतीने उभा राहिला आणि धोनीशी बोलला. दोघांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Hope the few fellow RR fans stop the dumb agenda against legend of the game Rahul Dravid. pic.twitter.com/srngE7b4Xs
— Praneesh (@praneeshroyce) March 30, 2025
CSK ला IPL 2025 मध्ये सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. संघाला राजस्थान विरुद्ध 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.