राहुल द्रविडच्या मुलाची भारतीय संघात निवड, 'हा' युवा क्रिकेटर बनला कर्णधार

भारताचा दिग्गज क्रिकेटर राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड याची एका ट्राय सीरिजसाठी भारताच्या अंडर 19 संघात निवड झाली आहे.   

पूजा पवार | Updated: Nov 11, 2025, 08:57 PM IST
राहुल द्रविडच्या मुलाची भारतीय संघात निवड, 'हा' युवा क्रिकेटर बनला कर्णधार
(Photo Credit : Social Media)

Cricket News : क्रिकेटमधील उभारता स्टार क्रिकेटर विहान मल्होत्रा याला मंगळवारी आगामी ट्राय सीरिजसाठी टीम इंडियाच्या अंडर-19 ए संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. या शृंखलामध्ये भारताचा 'बी' आणि अफगाणिस्तानचा अंडर-19 संघ सहभाग घेईल. हैद्राबादच्या आरोन जॉर्जला 17 ते 30 नोव्हेंबरपर्यंत बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत भारताच्या अंडर-19 'ब' संघाचा कर्णधार म्हणून घोषित केलं आहे. भारताचा दिग्गज क्रिकेटर राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड (Anvay Dravid) हा सुद्धा भारतीय अंडर-19 ब संघाकडून या स्पर्धेत खेळेल. 
 
विहान मल्होत्राकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे तर त्याचे दोन सुपरस्टार सहकारी वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे इतर स्पर्धांमध्ये व्यस्त आहेत. या तीन संघांच्या स्पर्धेत विकेटकीपर अभिज्ञान कुंडू 'अ' संघाचा उपकर्णधार असेल, तर वेदांत त्रिवेदीला भारताच्या 19 वर्षांखालील 'ब' संघासह ही जबाबदारी देण्यात आली आहे.

Add Zee News as a Preferred Source

आयुष म्हात्रे आता रणजी ट्रॉफीमध्ये खेळतोय, तर वैभव सूर्यवंशीला एसीसी राइजिंग स्टार्स एशिया कपसाठी भारतीय संघात निवडण्यात आलं आहे. ते तीनही खेळाडू नुकत्याच पार पडलेल्या टीम इंडिया अंडर १९ ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा भाग होते. 

कोण आहे अन्वय द्रविड?

अन्वय द्रविड हा भारताचा माजी कर्णधार आणि कोच राहुल द्रविडचा धाकटा मुलगा आहे. 2009 मध्ये अन्वयचा जन्म झाला होता तो सध्या १६ वर्षांचा आहे. राहुल द्रविडचा मोठा मुलगा समित हा सुद्धा क्रिकेटमध्येच करिअर करतोय. 

हेही वाचा : IPL 2026 पूर्वी मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिलीज करणार? दिग्गज क्रिकेटरने स्पष्टच सांगितलं

 

भारतीय अंडर-19 ए टीम :

विहान मल्होत्रा ​​(कर्णधार), अभिज्ञान कुंडू, वाफी कछी, वंश आचार्य, विनीत वीके, लक्ष्य रायचंदानी, ए रापोल, कनिष्क चौहान, खिलान ए पटेल, अनमोलजीत सिंह, मोहम्मद एनान, हेनिल पटेल, आशुतोष महिदा, आदित्य रावत और मोहम्मद मलिक

भारतीय अंडर-19 ब टीम :

आरोन जॉर्ज (कर्णधार), वेदांत त्रिवेदी, युवराज गोहिल, मौल्यराजसिंह चावड़ा, राहुल कुमार, हरवंश सिंह, अन्वय द्रविड़, आरएस अंबरीश, बीके किशोर, नमन पुष्पक, हेमचुदेशन जे, उद्धव मोहन, इशान सूद, डी दीपेश और रोहित कुमार दास

FAQ : 

ट्राय सीरिज कधी आणि कुठे होणार आहे?
ट्राय सीरिज 17 ते 30 नोव्हेंबरपर्यंत बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये होणार आहे.

ट्राय सीरिजमध्ये कोणते संघ सहभाग घेतील?
ट्राय सीरिजमध्ये भारताचा 'ए' आणि 'ब' संघ आणि अफगाणिस्तानचा अंडर-19 संघ सहभाग घेतील.

अन्वय द्रविड़ कोण आहे?
अन्वय द्रविड़ हा भारताचा माजी कर्णधार आणि कोच राहुल द्रविड़चा धाकटा मुलगा आहे.

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More