राजस्थानविरुद्धच्या मॅचआधी चेन्नईच्या टीमसाठी चांगली बातमी

तब्बल २ वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई आणि राजस्थानच्या टीमचं आयपीएलमध्ये पुनरागमन झालं आहे.

Updated: Apr 20, 2018, 07:55 PM IST
राजस्थानविरुद्धच्या मॅचआधी चेन्नईच्या टीमसाठी चांगली बातमी  title=

पुणे : तब्बल २ वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई आणि राजस्थानच्या टीमचं आयपीएलमध्ये पुनरागमन झालं आहे. या दोन्ही टीम आज आमने-सामने आहेत. या मॅचआधी चेन्नईच्या टीमसाठी चांगली बातमी आहे. दुखापतीमुळे बाहेर असलेल्या सुरेश रैनाचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. तर पाठीच्या दुखापतीमुळे हैराण असलेला धोनीही या मॅचमध्ये खेळत आहे. या मॅचमध्ये राजस्थाननं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

चेन्नईची टीम

शेन वॉटसन, अंबती रायडू, सुरेश रैना, सॅम बिलिंग्स, एम.एस.धोनी, रविंद्र जडेजा, ड्वॅन ब्राव्हो, दीपक चहर, करण शर्मा, शार्दूल ठाकूर, इम्रान ताहीर

राजस्थान रॉयल्स

अजिंक्य रहाणे, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जॉस बटलर, हेनरीच क्लासीन, स्टुअर्ट बिनी, क्रिष्णप्पा गौतम, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट, बेन लाफलिन