IPL 2026: आयपीएल मेगाऑक्शनपूर्वी राजस्थान रॉयल्समध्ये मोठे बदल, 'या' अनुभवी खेळाडूंची उचलबांगडी

Rajsthan Royals IPL 2026: राजस्थान रॉयल्स आता नवीन रणनीती आणि नवीन चेहऱ्यांसह आयपीएल 2026 च्या सिजनमध्ये प्रवेश करण्याच्या तयारी करत आहे. मात्र त्याआधी संघ तीन प्रमुख खेळाडूंना रामराम ठोकण्याच्याही तयारीत आहे. हे अनुभवी खेळाडू कोण आहेत माहितीये?   

Updated: Oct 11, 2025, 04:28 PM IST
IPL 2026: आयपीएल मेगाऑक्शनपूर्वी राजस्थान रॉयल्समध्ये मोठे बदल, 'या' अनुभवी खेळाडूंची उचलबांगडी

IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) च्या नव्या सिजनची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता आयपीएल 2026 ची तयारी सुरू झाली असुन संघांनी त्यांच्या संघात बदल करण्याबाबत चर्चा सुरु केली आहे. IPL संघांनी कित्येक खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर काही जणांनी स्वत:च काढता पाय घेतला आहे. त्यातच राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals)देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची तयारी करत आहे. मागील पर्वात संघाची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी असल्याने कर्णधार रियान पराग, तरुण वैभव सूर्यवंशी आणि यष्टीरक्षक ध्रुव जुरेल सारख्या खेळाडूंच्या दमदार कामगिरीनंतरही राजस्थान नवव्या स्थानावर राहिले. म्हणूनच व्यवस्थापन आता काही प्रमुख खेळाडूंना संघाबाहेर करण्याची योजना आखत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

संजू सॅमसनचं जाणं जवळजवळ निश्चित 
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनची रिलीजसाठी मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फ्रँचायझीने आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या हंगामात दुखापतींमुळे सॅमसन फक्त नऊ सामने खेळला होता आणि त्याला चांगली फलंदाजीदेखील करता आली नाही.
संजूने 2013 मध्ये राजस्थानकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून तो संघातील सर्वात विश्वासार्ह फलंदाजांपैकी एक बनल. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 4704 धावा केल्या आहेत, सर्व राजस्थानकडून खेळताना, परंतु वारंवार होणाऱ्या दुखापती आणि कर्णधारपदाच्या दबावामुळे त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला.

माहीष तीक्ष्णा देखील संघा बाहेर 
श्रीलंकेचा गोलंदाज माहीष तीक्ष्णा गेल्यावेळी राजस्थान रॉयल्सने 4.40 कोटी रुपयांना साइन केले. पण त्याची कामगिरी ही निराशाजनक होती. त्याने संपूर्ण IPLमध्ये फक्त 11 बळी घेतले, म्हणुन संघ आता अशा गोलंदाजाच्या शोधात आहे जो पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्स दोन्हीमध्ये प्रभावी ठरू शकेल. त्यामुळे राजस्थान तेक्ष्णाला सोडून चांगले पर्याय शोधू शकते.

शिमरॉन हेटमायरवरही टांगती तलवार
गेल्या काही वर्षांपसुन वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायरची कामगिरी घसरत चालली आहे. 11 कोटी राखण्यात आलेल्या हेटमायरने 2025 च्या हंगामात 14 सामन्यांमध्ये फक्त 239 धावा केल्या. तो संघात फिनिशरची भूमिका बजावण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. 2022 च्या हंगामानंतर हेटमायरने एकाही हंगामात 300 धावांचा टप्पा गाठलेला नाही. त्यामुळे, राजस्थान रॉयल्स त्याला सोडून नवीन फिनिशर किंवा पॉवर-हिटर शोधू शकते.

राजस्थान एक नवीन रणनीती घेऊन येईल
राजस्थान रॉयल्स आता नवीन रणनीती आणि नवीन चेहऱ्यांसह 2026 च्या हंगामात प्रवेश करण्याची तयारी करत आहे. संघाला बळकटी देण्यासाठी फ्रँचायझी अनुभवी अष्टपैलू खेळाडू आणि दमदार फलंदाजांच्या शोधात आहे. अशा परिस्थितीत, राजस्थान रॉयल्सचा पुढील सामन्यांमध्ये पूर्णपणे नवीन विचारसरणीने आणि नवीन कर्णधार घेऊन मैदनात उतरेल यात शंका नाही.

FAQ

1. आयपीएल 2026 च्या लिलावाची तारीख कधी आहे?

संघांना रिटेन्शनची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर 2025 आहे, आणि लिलाव 13-15 डिसेंबर 2025 दरम्यान होण्याची शक्यता आहे.

2. राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2025 साठी कोणत्या खेळाडूंना राखले होते?

आयपीएल २०२५ साठी यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर आणि संदीप शर्मा यांना राखले होते.

3. राजस्थान रॉयल्सच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल होत आहेत का?

होय, राहुल द्रविड यांच्या जागी माजी श्रीलंकन कर्णधार कुमार संगकारा मुख्य भूमिकेत परत येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे संघाची रचना बदलणार आहे

About the Author