रोहित - विराट ऑस्ट्रेलिया सीरिजनंतर वनडे क्रिकेटमधून घेणार निवृत्ती? BCCI ने स्पष्ट केलं

Virat And Rohit Retirement : बीसीसीआयने या सीरिजसाठी विराट कोहली आणि रोहित शर्माचा टीम इंडियात समावेश केला आहे. विराट आणि रोहित या दोघांनी पूर्वीच टी 20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीये. मात्र अजूनही ते वनडे फॉरमॅटमध्ये खेळतायत. असं असताना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी विराट आणि रोहितबाबत एक वक्तव्य केलं आहे. 

पूजा पवार | Updated: Oct 15, 2025, 12:47 AM IST
रोहित - विराट ऑस्ट्रेलिया सीरिजनंतर वनडे क्रिकेटमधून घेणार निवृत्ती? BCCI ने स्पष्ट केलं
(Photo Credit - Social Media)

Virat And Rohit Retirement : येत्या 19 ऑक्टोबर पासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND VS AUS) यांच्यात वनडे सीरिजला सुरुवात होत आहे. यासाठी टीम इंडिया (Team India) 15 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. बीसीसीआयने या सीरिजसाठी विराट कोहली (Virat Kohli)  आणि रोहित शर्माचा (Rohit Sharma) टीम इंडियात समावेश केला आहे. विराट आणि रोहित या दोघांनी पूर्वीच टी 20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीये. मात्र अजूनही ते वनडे फॉरमॅटमध्ये खेळतायत. रोहित आणि विराट ऑस्ट्रेलिया सीरिजनंतर वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेतील असं म्हटलं जातंय. तसेच सिलेक्टर कमिटीचे चेअरमन अजित आगरकर यांनी आधीच सांगितली की विराट आणि रोहित  या दोघांना वर्ल्‍ड कप 2027 च्या टीममध्ये प्राधान्य नाहीये. तर ऑस्ट्रेलिया सीरिजपूर्वी रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेणं हे त्याच्या निवृत्तीचा अजून एक संकेत मानला जातोय. असं असताना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी विराट आणि रोहितबाबत एक वक्तव्य केलं आहे. त्यांनी हा दावा धुडकावून लावलाय की ऑस्ट्रेलिया दौरा विराट आणि रोहितचा शेवटचा दौरा असेल. 

Add Zee News as a Preferred Source

काय म्हणाले राजीव शुक्ला?

राजीव शुल्काने म्हटले की, विराट आणि रोहितच्या असण्याने टीमला फायदा होईल. तसेच त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की निवृत्ती घेणं हा नेहमी खेळाडूंचा वैयक्तिक निर्णय राहिलाय यात बीसीसीआय कोणताही हस्तक्षेप करत नाही. एएनआयशी बोलताना राजीव शुक्ला म्हणाले की, 'ते दोघेही उत्कृष्ट फलंदाज आहेत. त्यांच्या मदतीने आपण ऑस्ट्रेलियाला हरवू शकतो. ही त्यांची शेवटची वनडे सीरिज आहे असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. खेळाडूंनी कधी निवृत्ती घ्यायची हे त्यांनीच ठरवायचं आहे'.

केवळ वनडेत खेळतायत रोहित आणि विराट : 

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून येथे ते 3 सामन्यांची वनडे सीरिज आणि 5 सामन्यांची टी 20 सीरिज खेळतील.  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे सीरिजला 19 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे, वनडेत शुभमन गिल आणि टी 20 मध्ये सूर्यकुमार यादव हा भारताचा कर्णधार आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट हे संघात सामान्य खेळाडूप्रमाणे खेळताना दिसतील. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर दोघे प्रथमच टीम इंडियासोबत मैदानात उतरणार आहेत. तेव्हा दोघे ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसा परफॉर्मन्स करतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

FAQ : 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सीरिज कधी सुरू होणार आहे?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सीरिज 19 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहे.

वनडे सीरिजसाठी भारतीय संघाचे कर्णधार कोण आहेत?
वनडे सीरिजसाठी शुभमन गिल भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळेल, तर टी-20 सीरिजसाठी सूर्यकुमार यादव कर्णधार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर विराट आणि रोहित वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहेत का?
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी हे स्पष्ट केले आहे की ऑस्ट्रेलिया दौरा हा विराट आणि रोहित यांचा शेवटचा दौरा असेल असा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. निवृत्तीचा निर्णय हा खेळाडूंचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यात बीसीसीआय हस्तक्षेप करत नाही.

About the Author