लाडक्या कॅप्टन हरमनप्रीतसाठी जेमीमा आणि हरलीनने गायले हटके Rap song, व्हिडीओ एकदा पहाच!

Rap Song For Harmanpreet: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. खेळाडूंसहित संपूर्ण भारतभार या विजयाचा जल्लोष अजूनही साजरा केला जात आहे दरम्यानच जेमीमा आणि हरलीनने त्यांच्या लाडक्या कॅप्टनसाठी मजेदार रॅप सॉंग गायले आहे. हा रॅप सॉंग एकदा ऐकाच.

Updated: Nov 7, 2025, 04:12 PM IST
लाडक्या कॅप्टन हरमनप्रीतसाठी जेमीमा आणि हरलीनने गायले हटके Rap song, व्हिडीओ एकदा पहाच!

Jemimah and harlin's Rap Song: 2 नोव्हेंबर 2025 हा दिवस भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. या दिवशी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक जिंकून इतिहास रचला. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रोमांचक फायनल सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला. हा विजय केवळ मैदानावरच नव्हे तर लाखो भारतीयांच्या हृदयातही नोंदला गेला. देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आणि सोशल मीडियावर खेळाडूंचे कौतुक झाले. या भव्य विजयाला चार दिवस उलटले तरी जल्लोष काही कमी झालेला नाही.

Add Zee News as a Preferred Source

विश्वचषक जिंकल्यानंतर, भारतीय महिला संघाने मैदानावर आनंदोत्सव साजरा केला ज्यामुळे सर्वांनाच खूप आनंद झाला. खेळाडूंनी सेंटर विकेटभोवती एकत्र येऊन पहिल्यांदाच त्यांचे टीम इंडिया गाणे गायले. बीसीसीआयच्या महिला संघाच्या हँडलने सोशल मीडियावर ही क्लिप शेअर केली तेव्हा ती लगेच व्हायरल झाली. व्हिडिओमध्ये, खेळाडू ट्रॉफीसोबत नाचताना आणि गाताना दिसत होत्या. रात्री उशिरापर्यंत स्टेडियम 'टीम इंडिया' गाण्याने दुमदुमूले होते.
अलीकडेच भारतीय खेळाडू जेमिमा आणि हरलीनने हरमनप्रीतसाठी गायलेल्या  रॅप सॉंगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या खेळाडू रॅप सॉंगमध्ये हरमनला "पंजाबीयोंकी शान है ये लडकी शक्तीमान है, पूरा किया सपना है वर्ल्डकप अब अपना ही है" म्हणत त्यांच्या आवडत्या कॅप्टनचं भरभरून कौतुक केलं.

हा पाहा व्हिडीओ

वर्ल्डकप जिंकून परत येताना महिला क्रिकेट संघाने फ्लाईटमध्येही भरपूर धमाल मस्ती केली तसेच सगळ्या महिला खेळाडू ऐकमेकांचा खूप आदर करतात तसेच कौतुकही करतात जसे यावेळी हरलीन आणि जेमिमाने केले. वरिल व्हिडीओमध्ये त्यांचा अपार आनंद पाहून चाहते खूप खूश झालेत.

हे ही वाचा: IPL Auction: ठरलं! 'या' दिवशी होणार आयपीएल 2026 लिलाव, 'हे' असू शकतं ठिकाण

About the Author