ICC Test Ranking: रवींद्र जडेजाने रचला इतिहास, 'असा' पराक्रम करणारा बनला जगातील पहिला खेळाडू!

Ravindra Jadeja ICC Test Ranking History: अष्टपैलू रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय.

प्रविण दाभोळकर | Updated: May 14, 2025, 10:06 PM IST
ICC Test Ranking: रवींद्र जडेजाने रचला इतिहास, 'असा' पराक्रम करणारा बनला जगातील पहिला खेळाडू!
रवींद्र जडेजा

Ravindra Jadeja ICC Test Ranking History: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा त्याच्या खास गोलंदाजी आणि फलंदाजीच्या शैलीसाठी ओळखला जातो. असं असताना रँकिंगच्या बाबतीत जडेजाने आता जागतिक क्रिकेटमध्ये एक खास विक्रम केलाय. ज्यामुळे क्रिकेट फॅन्सकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. 

अष्टपैलू रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. तो आता आयसीसी कसोटी क्रमवारीच्या इतिहासात सर्वात जास्त काळ नंबर 1 कसोटी अष्टपैलू खेळाडू बनलाय. एकूण 1,151 दिवस अव्वल स्थानावर राहून जडेजाने ही कामगिरी केली.

हा विक्रम केवळ त्याच्या सातत्य आणि कामगिरीचा पुरावा आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि चेंडू दोन्हीने टीम इंडियाला सातत्याने बळकटी दिली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे तो क्रिकेट इतिहासातील महान अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत आणखी वर गेलाय.

विराट, रोहितनंतर जडेजा घेणार निवृत्ती? 

विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या तीन दिग्गज क्रिकेटर्सनी वर्ल्ड कप 2024 जिंकल्यावर टी 20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आकाश चोप्राचं म्हणणं आहे की हे तीन सिनिअर खेळाडू 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत वाट पाहतील असं वाटत नाही. आकाश चोप्राने त्याच्या युट्युब चॅनलवर बोलताना म्हंटले की चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयसीसी करिअरला पूर्णविराम देण्याची चांगली संधी या तीन दिग्गजांकडे आहे. माजी क्रिकेटर आणि कॉमेंटेटर आकाश चोप्राने त्याच्या युट्युब चॅनलवर बोलताना म्हटले की, 'मी जड अंतःकरणाने बोलतोय... दाट शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे त्यानंतर यावर्षी फक्त एक आयसीसी टूर्नामेंट असेल जो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आहे, आणि जिथे भारत पोहोचू शकला नाही. त्यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यापैकी कोणीच खेळणार नाही. त्यानंतर पुढच्यावर्षी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप आहे. परंतु टी 20 क्रिकेटमधून तीन दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतलीये. त्यामुळे हे तिघे तिथेही दिसणार नाहीत. वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये होईल जो सध्या खूपच दूर आहे. 2027 पर्यंत जग खूप वेगळं असेल. त्यामुळे मला आणि इतर काही खेळाडूंनाही वाटतं की चॅम्पियन्स ट्रॉफी ही या तीन दिग्गज खेळाडूंची शेवटची आयसीसी टूर्नामेंट असेल.